पीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) विमा क्षेत्रातील कंपनी असलेल्या कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्समधील १० टक्के हिस्सा विकणार आहे. कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स भांडवली बाजारात सूचिबद्ध केली जाणार आहे. सध्या या विमा कंपनीमध्ये पंजाब नॅशनल बँकेची २३ टक्के हिस्सेदारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

पंजाब नॅशनल बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत बँकेची सहयोगी कंपनी कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनीमधील बँकेची १० टक्के हिस्सेदारी कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय आता भांडवली बाजार नियामक सेबीच्या मान्यतेच्या अधीन आहे.एचएसबीसी आणि सरकारी बँक असलेली कॅनरा बँक या आयुर्विमा कंपनीचे प्रवर्तक आहेत, ज्यांचे अनुक्रमे २६ टक्के आणि ५१ टक्के हिस्सेदारी आहे. पीएनबीची देखील त्यात २३ टक्के हिस्सेदारी आहे.