पीटीआय, मुंबई : रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि मुक्त भांडवली खाते परिवर्तनीयतेतून संभवणारी जोखीम पाहता, भारताला विनिमय दरातील अस्थिरतेच्या व्यवस्थापनासाठी कायम तत्पर राहावे लागेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव यांनी गुरुवारी व्यक्त केले. रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे काही फायदे जसे आहेत, तसे त्यापायी आव्हाने आणि धोकेही दिसून येतात. यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँकेला या त्यानुरूप बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्थव्यवस्था ही इतर जगाशी जोडली जात असताना अधिकाधिक संस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परकी चलन जोखमीला सामोरे जाण्याची शक्यता असते. बदल हा सातत्यपूर्णच असतो आणि भारतीय परकीय चलन बाजारपेठेत मागील काही दशकांपासून विकासासह, नावीन्यपूर्ण गोष्टी सातत्याने घडत आहेत, असे राव यांनी नमूद केले. राव म्हणाले की, अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाईल आणि अधिक विकसित होईल, तसतशी विदेशी चलन बाजारातील मध्यवर्ती बँकेच्या सहभागाची व्याप्ती बदलत जाईल.