२०२२-२३ या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी ६.९८ कोटींहून अधिक प्राप्तिकर रिटर्न भरले गेले आहेत. त्यापैकी सहा कोटींहून अधिक रकमेवर प्रक्रियाही झाली आहे. प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट टॅक्सशी संबंधित सर्वोच्च संस्था सीबीडीटीने महत्त्वाची माहिती दिली आहे. CBDT नुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी दाखल केलेल्या एकूण ITR पैकी सुमारे १४ लाख रिटर्न करदात्यांकडून पडताळणे बाकी आहे. याशिवाय विभागाने १२ लाख करदात्यांच्या उत्पन्नाशी संबंधित अतिरिक्त माहिती मागवली आहे. या संदर्भात त्यांना ई-फायलिंग खात्यांची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचाः Money Mantra : पत्नीच्या नावावर सोने खरेदी करून कर बचत करता येते का? नियम काय सांगतो?
तसेच काही आयटीआर फाइलर्सनी अद्याप त्यांची बँक खाती पडताळलेली नाहीत. २०२३-२४ कर मूल्यांकन वर्षात ५ सप्टेंबरपर्यंत एकूण ६.९८ कोटी ITR सबमिट केले गेले आहेत, त्यापैकी ६.८४ कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली आहे. सहा कोटींहून अधिक आयटीआर म्हणजे एकूण पडताळलेल्या रिटर्नपैकी ८८ टक्के प्रक्रिया केली गेली आहे.
हेही वाचाः Money Mantra : गृहकर्ज निवडण्याचा योग्य मार्ग कोणता? व्याजदरावर कसा परिणाम होतो? संपूर्ण गणित समजून घ्या
प्राप्तिकर विभागाने २.४५ कोटी रिटर्न फाइल करणाऱ्यांना परतावा जारी केला आहे. प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्यानंतर त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच प्राप्तिकर विभाग रिटर्नची प्रक्रिया करते आणि रिफंडचे दावे निकाली काढते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ITR प्रक्रियेसाठी सरासरी ८२ दिवस आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६ दिवसांचा कालावधी लागला. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ही वेळ १० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.