UCO Bank Fraud Case: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने UCO बँकेतील ८२० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या फसवणुकीचे सूत्रधार दोन अभियंते होते. खासगी बँकांच्या १४ हजार खात्यांमधून त्यांनी युको बँकेच्या ४१ हजार बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. या फसवणुकीसाठी ८.५३ लाख IMPS व्यवहार करण्यात आले. यानंतर बँकेने तत्काळ कारवाई करत IMPS सेवेवर बंदी घातली. याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

४१ हजार खात्यात पैसे गेले, अनेकांनी ते काढले

तपासादरम्यान सीबीआयने कोलकाता आणि मंगळुरूसह अनेक शहरांमध्ये १३ ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचानक पैसे आल्यानंतर अनेकांनी पैसे काढून घेतले. आश्‍चर्याची बाब म्हणजे ज्या खासगी बँकांमधून पैसे काढण्यात आले, त्यांच्या १४ हजार खात्यांमधून पैसे वजा झालेले नाहीत. युको बँकेच्या केवळ ४१ हजार खात्यांमध्ये पैसे आले होते. युको बँकेला तीन दिवसांनंतर ही बाब कळताच त्यांनी सीबीआयकडे त्यांच्या दोन सपोर्ट इंजिनीअर्सविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, तपास यंत्रणेने या अभियंते आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शोधादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक, ईमेल संग्रहण आणि डेबिट/क्रेडिट कार्डसह अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील जप्त करण्यात आले.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हेही वाचाः गावागावांमध्ये आता रोजगार वाढणार, मोदी सरकारकडून मनरेगा अंतर्गत १०,००० कोटींचा अतिरिक्त निधी जारी

अयशस्वी व्यवहार दाखवून पैसे लुटले

युको बँकेच्या म्हणण्यानुसार, या फसवणुकीत ज्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले गेले होते ते अयशस्वी व्यवहार दर्शवत होते. पण युको बँकेच्या खात्यात पैसे येत होते. हा पैसाही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे खर्च केला. तसेच इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले.

हेही वाचाः भारत दाखवणार पाकिस्तानला आता आपली खरी ताकद, अदाणींच्या मदतीनं सीमेवर करणार ‘हे’ मोठे काम

बँकेने ६४९ कोटी रुपयांच्या वसुलीचा दावा केला होता

ही समस्या तांत्रिक समस्या असल्याचे वर्णन करताना यूको बँकेने सांगितले होते की, IMPS सेवेतील समस्येमुळे अडकलेल्या ८२० कोटींपैकी सुमारे ६४९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित १७१ कोटी रुपयेही लवकरच वसूल केले जातील. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की, सर्वात मोठी अडचण IDFC फर्स्ट बँकेच्या बचत खात्यातून UCO बँकेत IMPS करण्यात होती. यामध्ये IDFC फर्स्ट बँक खात्यातून पैसे डेबिट झाले नाहीत. पण UCO बँक खात्यात पैसे यायचे.