पीटीआय, नवी दिल्ली
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छतागृहे, बाल संगोपन कक्ष यासह इतर अनेक सुविधांना सुसज्ज करणाऱ्या ‘हमसफर धोरणा’ची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी घोषणा केली. हमसफर धोरणानुसार, देशातील राष्ट्रीय महामार्गांवर अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. यात स्वच्छ प्रसाधनगृहे, बाल संगोपन कक्ष, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र, वाहनतळ आणि पेट्रोल पंपांवर निवासाची सुविधा यांचा समावेश आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सोयीच्या आणि सुरक्षित अशा या सुविधा असतील. त्यांचा प्रवासाचा अनुभव या माध्यमातून आनंददायी करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर यातून स्वयंउद्योजकतेला बळ मिळून रोजगार निर्मिती होईल. तसेच, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in