Reliance Shares चंदीगडच्या रहिवाशाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे हरवलेले शेअर्स सापडले. त्याने या शेअर्सचा फोटो पोस्ट केला. ज्यानंतर या शेअर्सबाबत विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बऱ्याच युजर्सनी या चंदीगडच्या रहिवाशाला जे सल्ले दिले आहेत ते ऐकून तुम्ही खो खो हसाल.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

नेमकं काय घडलं?

एक काळ असाही होता जेव्हा शेअर बाजार हा डिजिटल स्वरुपात नव्हता. त्यावेळी शेअर्स हे कागद रुपात असायचे. त्यामुळे अशाही घटना घडल्या आहेत की हरवलेले शेअर्स लोकांना सापडले आणि ते लखपती वगैरे झाले. अशीच एक घटना चंदीगडमध्येही घडली आहे. रतन धिल्लों यांना ३७ वर्षांपूर्वीचे हरवलेले शेअर्स सापडले. हे शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहेत.

रतन धिल्लोंची पोस्ट काय?

मला घर आवरत असताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे हे शेअर्स सापडले आहेत. मला स्टॉक मार्केटबाबत काहीही कल्पना नाही. कुणी मला सांगेल का? की या शेअर्सचं काय करायचं? या शेअर्सची किंमत अजूनही मला मिळू शकते का? हे विचारताच रतन ढिल्लों यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव झाला. त्यांनी ही पोस्ट @reliancegroup लाही टॅग केली आहे.

आज या शेअर्सचं मूल्य काय?

व्हायरल होणाऱ्या पोस्ट नुसार शेअरहोल्डरने सांगितलं आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३० इक्विटी शेअरची किंमत ३०० रुपये होती. कारण १९८८ मध्ये १० रुपयांचा एक शेअर होता. असे ३० शेअर म्हणजे त्याची किंमत झाली ३०० रुपये. तर एका युजरने कमेंट करत सांगितलं साधारण अंदाज काढला ३० म्हणजे तीनवेळा स्टॉक स्पिट आणि दोनदा बोनस शेअर जारी झाल्यानंतर आजच्या गणिताप्रमाणे या शेअर्सना ९६० शेअर्सचं मूल्य आहे. आजचा एका शेअरचा भाव १२४८ रुपये आहे. त्यानुसार हे साधारण १२ लाखांचे शेअर्स आहेत. तुमची तर लॉटरी लागली.

रतन धिल्लोंच्या पोस्टवर IEPFA चं म्हणणं काय?

IEPFA म्हणेजच Investor Education and Protection Fund Authority ढिल्लों यांच्या पोस्टवर उत्तर देत सांगितलं की तुम्ही हे तपासू शकता की हे शेअर्स तपासण्यासाठी त्याची खात्री पटवण्यासाठी तुम्ही IEPFA च्या वेबसाइटवरील सर्च पर्यायाचा उपयोग करु शकता. आणखी एका युजरने सल्ला दिला आहे की रतनभाई आपकी लॉटरी लग गयी है. आप remat से demat करावो लो. कुछ मदत चाहिये तो मुझसे डायरेक्ट मेसेजपर बात करो. तर दुसरा एक युजर म्हणाला की रतनभाऊ तुम्ही घरात आणखी शोधाशोध करा. तु्म्हाला कदाचित MRF चे शेअर्सही मिळतील. रतन ढिल्लों यांनी जेव्हापासून पोस्ट केली आहे तेव्हापासून त्यांच्या या पोस्टवर अनेक विनोदी कमेंटच येत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandigarh man discovers 37 year old reliance shares worth rs 11 lakh sparks humorous reactions online scj