१ जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना ०.१० ते ०.३० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. सलग चौथ्या तिमाहीत केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्यक्त वाढ केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत लोकप्रिय सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र यावरील व्याजदरात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कोणताही बदल केलेला नाही. सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र यावरील व्याजदर अनुक्रमे ८.२ टक्के आणि ७.५ टक्के तर पीपीएफवर ७.१ टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.

शनिवारपासून (१ जुलै) लागू होणाऱ्या सुधारित दरांनुसार, पोस्टाच्या एका वर्षांच्या मुदत ठेवींवर आता ६.९ टक्के व्याज मिळणार आहे. त्यावर आधी ६.८ टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर आता ६.९ टक्क्यांऐवजी ७ टक्के व्याज मिळणार आहे. तर पाच वर्ष मुदतीच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदर ०.३ टक्क्यांनी वाढवत ६.५ टक्क्यांवर नेला आहे. गेल्या तिमाहीतही विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. तिमाहीगणिक बदलत्या बाजारस्थितीनुसार व्याजाचे दर केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून पुन:निर्धारीत केले जातात. रिझव्र्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता अपेक्षेप्रमाणे अल्पबचत योजनांवरील व्याजदरात स्पर्धात्मक वाढीचे पाऊल टाकण्यात सुरुवात केली आहे.

हेही वाचाः वित्तीय तुटीत घसरण; एप्रिल, मे महिन्यांत २.१० लाख कोटी रुपयांवर

महिला सन्मान बचतपत्रे आता बँकेतही उपलब्ध

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान बचतपत्र आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि खासगी क्षेत्रातील ठराविक बँकांमध्ये देखील प्राप्त होणार आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सर्व पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्यूल्ड बँकांमध्ये देखील उपलब्ध असेल, असे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. योजनेमध्ये कोणाही महिलेला दोन वर्षांच्या कालावधीसाठी खाते उघडता येईल. तसेच योजनेत किमान गुंतवणुकीची रक्कम १,००० रुपये आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा २ लाख रुपये आहे, गुंतवणूकदारांना ७.५ टक्के दसादशे व्याज तिमाही आधारावर मिळेल. गरजेच्या वेळी खात्यात जमा रकमेच्या ४० टक्के रक्कम काढता येईल.

हेही वाचाः Money Mantra : LIC कडून धन वृद्धी योजना लाँच, ‘या’ तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in interest rates on post office deposit schemes investors will get huge benefits on small savings schemes vrd