देशातील महारत्न कंपनी कोल इंडियाने सप्टेंबरच्या तिमाहीत कोळसा विकून मोठा नफा मिळवला आहे. कंपनीच्या नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे महसुलात १० टक्के वाढ दिसून आली आहे. यानिमित्ताने कंपनीने गुंतवणूकदारांना दिवाळी भेट दिली असून १५ रुपयांपेक्षा जास्त लाभांशही जाहीर केला आहे. कोल इंडियाचे शेअर्स आज शेअर बाजारात स्थिर किमतीवर बंद झाले. कोल इंडियाने आता कोणत्या प्रकारचे त्रैमासिक निकाल जाहीर केलेत ते जाणून घेऊ यात.

नफा आणि महसूल वाढणार

कोल इंडियाने शुक्रवारी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १२.५ टक्के वाढीसह कंपनीने ६८०० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. महसुलाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तो १० टक्क्यांनी वाढून ३२,७७६.४१ कोटी रुपये झाला आहे. कंपनी बोर्डाने चालू आर्थिक वर्षासाठी १५.२५ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कोळसा प्रमुखांनी यासाठी २१ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?

हेही वाचाः भारताला तैवानकडून दिवाळीच्या सणातच गुड न्यूज, चीनचा विरोध झुगारून १ लाखांहून अधिक भारतीयांना देणार रोजगार

उत्पादनात वाढ

कंपनीने EBITDA मध्ये १२ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदवली आहे आणि ती ८,१३७ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. ऑपरेटिंग मार्जिन ४३ बेसिस पॉइंटने वाढून २४.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पादन १५७.४३ दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी १३९.२३ दशलक्ष टन होते आणि तिमाहीपूर्वी १७५.४८ दशलक्ष टन होते. खाणीतून १७३.७३ दशलक्ष टन कोळसा उचलला गेला, जो एका वर्षापूर्वी १५४.५३ दशलक्ष टन होता आणि गेल्या तिमाहीत १८६.९५ दशलक्ष टन होता.

हेही वाचाः Money Mantra : दिवाळीपूर्वीच EPFO ​​खातेदारांना गिफ्ट, व्याजाचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, ‘अशा’ पद्धतीनं बॅलन्स तपासा

किती कर भरला?

या तिमाहीत इतर स्त्रोतांकडून मिळकत १९८४ कोटी रुपये होती, जी एका वर्षापूर्वी १७६१ कोटी रुपये होती. एकूण खर्च २६,००० कोटी रुपये होता, तर वर्षभरापूर्वी तो २३,७७० कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत निव्वळ कर खर्च वाढून २,०३६.५१ कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या १,६४३.४९ कोटी होता. सप्टेंबरमध्ये संपलेल्या सहा महिन्यांचा महसूल वार्षिक तुलनेत ६ टक्क्यांनी वाढून ६८,७५९.६२ कोटी रुपये झाला, तर नफा जवळपास १ टक्क्यांनी घसरून १४,७७१ कोटी रुपयांवर आला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जगातील सर्वात मोठ्या कोळसा कंपनीचे शेअर्स ३२३.४० रुपयांवर बंद झाले.