नवी दिल्ली : वीज आणि पोलाद आदी क्षेत्रात वाढती मागणी राहिल्याने सरलेल्या एप्रिलमध्ये देशाच्या प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये ६.२ टक्के दराने वाढ नोंदली गेल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या मार्च महिन्यात प्रमुख क्षेत्रांनी ६ टक्के वाढ नोंदवली होती, तर गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये प्रमुख क्षेत्रांनी केवळ ४.६ टक्के वाढ साधली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> इंग्लंडमधील १०० टन सोने देशाच्या तिजोरीत, निम्मा सुवर्ण-साठा अजूनही परदेशात

आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, ऊर्जा, इंधन शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि खते यांचा समावेश होतो. सरलेल्या एप्रिल महिन्यात खते वगळता कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि वीज या सात प्रमुख क्षेत्रांचा विस्तार झाला आहे. यापैकी कोळसा आणि वीज उत्पादनाने अनुक्रमे ७.५ टक्के आणि ९.४ टक्के अशी वाढ नोंदवली गेली आहे. सिमेंटचे उत्पादन मार्चमधील १०.६ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये अवघे ०.६ टक्क्यांनी वाढले, तर पोलाद उत्पादनात मार्चमधील ७.१ टक्क्यांवरून वार्षिक ६.४ टक्के वाढ झाली. त्यापाठोपाठ नैसर्गिक गॅसने ८.६ टक्के आणि इंधन शुद्धीकरण उत्पादने ३.९ टक्क्यांनी विस्तारले आहे. खताचे उत्पादन ०.८ टक्क्यांनी घसरले, तर मार्च महिन्यात ते २ होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Combined index of 8 core industries in india increases by 6 2 in april 2024 print eco news zws