SEMICON India 2023 Inauguration : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज गुजरातच्या गांधीनगरमध्ये सेमीकॉन इंडिया २०२३ (SEMICON India 2023) चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सेमीकंडक्टरशी संबंधित तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे. सध्या सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक आहे, तसाच हा कार्यक्रमही आहे. सेमीकॉन इंडियाच्या माध्यमातून उद्योग आणि धोरणकर्ते यांच्याशी संबंध अद्ययावत केले पाहिजेत. संबंधांमधील समन्वयासाठी हे आवश्यक आहे, असे सेमीकॉन इंडिया २०२३ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. तसेच “भारतात या आणि गुंतवणूक करा,” अशी सादही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक चिप निर्मात्यांना घातली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाने १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला

पीएम मोदी म्हणाले की, भारताच्या डिजिटल क्षेत्रात आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आम्ही वेगाने वाढ पाहत आहोत. काही वर्षांपूर्वी भारत या क्षेत्रातील एक उदयोन्मुख खेळाडू होता आणि आज जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आपला वाटा अनेक पटींनी वाढला आहे. २०१४ मध्ये भारताचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ३० बिलियन डॉलरपेक्षा कमी होते. आज १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.

EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
security beefed up around z morh tunnel
‘झेड मोढ’ बोगद्याभोवती सुरक्षा व्यवस्थेत वाढ; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटनाची शक्यता
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?

हेही वाचाः Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

इलेक्ट्रॉनिक्स निर्यात दुपटीने वाढली

भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केवळ २ वर्षांत दुप्पट झाली आहे. भारतात बनलेल्या मोबाईल फोनची निर्यात दुपटीने वाढली आहे. जो देश एकेकाळी मोबाईल फोनचा आयातदार होता, तो देश आज जगातील सर्वोत्तम मोबाईल फोन्सची निर्मिती आणि निर्यात करीत आहे, असंही मोदींनी अधोरेखित केलं.

हेही वाचाः August Bank Holiday : ऑगस्टमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर

कंपन्यांना ५० टक्के आर्थिक मदत मिळेल

भारतामध्ये सेमीकंडक्टर उद्योगासाठी संपूर्ण जगात संधी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन वर्षांत भारतातून इलेक्ट्रॉनिक्स निर्यात दुपटीने वाढली आहे. माझा विश्वास आहे की, आपण जगात जी चौथी औद्योगिक क्रांती पाहत आहोत, ती भारतीय आकांक्षांनी प्रेरित आहे. भारतात सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के आर्थिक मदत दिली जाणार आहे. सेमीकंडक्टरशी संबंधित अभ्यासक्रम भारतातील ३०० महाविद्यालयांमध्ये सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Story img Loader