सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुरुवारी १३ जुलै रोजी एक घोषणा केलीय.प्रवर्तकांना आता त्यांचे कौटुंबिक करार उघड करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे हे करार सूचिबद्ध घटकांच्या व्यवस्थापन नियंत्रणावर थेट परिणाम करू शकतात, असं सेबीला वाटते. नियमांनुसार, जारी केलेल्या अधिसूचनेच्या तारखेनुसार सर्व करार कायम राहतील ते स्टॉक एक्स्चेंजला जाहीर करावे लागतील. यापूर्वी केवळ संभाव्य करार उघड करणे आवश्यक होते.

काय आहे SEBI चा नवा नियम?

या नवीन नियमामुळे सेबीचा प्रमुख भागधारकांतील सर्व गुप्त करारांमध्ये अधिसूचनेद्वारे पारदर्शकता आणण्याचा मानस आहे. नवीन सुधारणा अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून म्हणजेच १५ जुलैपासून ३० व्या दिवसापर्यंत लागू होणार आहे. SEBI च्या नव्या दुरुस्तीनुसार, सर्व भागधारक, प्रवर्तक, प्रवर्तक संस्था, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित करणार्‍या कराराची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून सूचीबद्ध घटकाचे व्यवस्थापन नियंत्रण त्या सर्वांना उघड करावे लागणार आहे.

three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

वकील विनय चौहान यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने अधिसूचित केलेल्या नियमांनुसार प्रवर्तक किंवा भागधारक यांच्यातील कौटुंबिक समझोत्यासह सर्व करार जे सूचीबद्ध कंपनीच्या व्यवस्थापनावर किंवा नियंत्रणावर परिणाम करू शकतात ते स्टॉक एक्स्चेंजला उघड करणे आवश्यक आहे. या सुधारणांमुळे पारदर्शकता आणखी वाढणार आहे. यात आता प्रवर्तक किंवा भागधारक यांच्यातील करारांचा समावेश असेल ज्यात सूचीबद्ध कंपनी पक्ष नाही, असंही चौहान म्हणतात.

हेही वाचाः तांदळाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने बनवली जबरदस्त योजना; उचलू शकतात ‘हे’ मोठे पाऊल

दायित्वे आणि खुलासा आवश्यकता नियमात सुधारणा

SEBI ने यंदा मार्चमध्ये झालेल्या त्यांच्या बोर्डाच्या बैठकीत लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन २०२३ मध्ये सुधारणांना मंजुरी दिली. दुरुस्तीनुसार, सूचीबद्ध घटकाला अधिसूचनेच्या तारखेला त्यांच्याकडे असलेल्या करारांची संख्यादेखील उघड करावी लागेल. यामध्ये कंपनीच्या वेबपेजचाही समावेश आहे, जिथे सर्व माहिती उपलब्ध आहे. भारतातील अनेक व्यवसाय कुटुंबांद्वारे चालवले जातात. यापैकी काही कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वाद होत आहेत. उदाहरणार्थ, पुण्यातील किर्लोस्कर बंधू, बाबा कल्याणी आणि त्यांची बहीण सुगंधा हिरेमठ रासायनिक कंपनी हिकाल अशी अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचाः तांदळाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने बनवली जबरदस्त योजना; उचलू शकतात ‘हे’ मोठे पाऊल

सुमारे १० वर्षे सल्लागार म्हणून काम केलेले देव प्रकाश बावची सांगतात

ग्राहकांनी सेबीच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, कारण हा त्यांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्याच्या कुटुंबाची किंवा अशा भागधारकांची माहिती उघड केल्याने तो SEBI च्या नजरेत एक जबाबदार गुंतवणूकदार म्हणून उदयास येतो आणि त्याचा फायदा त्याला होतो, कारण SEBI ही बाजार नियामक संस्था आहे, त्यामुळे गुंतवणुकीशी संबंधित नियमांवर लक्ष ठेवणे हे त्याचे काम आहे.