मुंबई देशातील बँकिंग क्षेत्राने सरलेल्या मार्च महिन्यात कर्ज वितरणात चांगली वाढ नोंदविली असून, मुख्यत्वे, उद्योगधंद्यांना कर्ज वितरणाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वैयक्तिक कर्ज वितरणाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. ‘केअरएज रेटिंग्ज’ने देशाच्या बँकिंग क्षेत्रातील कर्ज वितरणाचा अहवाल सोमवारी जाहीर केला आहे. यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये बँकांचे एकूण कर्ज वितरण २०.२ टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीसाठी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलीनीकरण कारणीभूत ठरले आहे. एचडीएफसीचे विलीनीकरण गृहित न धरता कर्ज वितरणातील वाढ १६.३ टक्के आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती १५ टक्के होती. वैयक्तिक कर्जांमध्ये गृहकर्जाचे वितरण मार्चमध्ये ३६.९ टक्के वाढले आहे. याचवेळी वाहन कर्ज वितरणातील वाढ कमी होऊन १७.३ टक्क्यांवर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा