पुणेः बहुराज्यांत विस्तार असलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडल्याचे बँकेने जाहीर केले. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०२४ अखेर संपुष्टात येत आहे. ‘बहुराज्यीय सहकारी संस्था कायदा २००२’मधील तरतुदीनुसार सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार यंदाची निवडणूक झाल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊन यांनी जाहीर केले.
हेही वाचा >>> रुपया सलग सहाव्या सत्रात नवीन तळ गाठत प्रति डॉलर ८५.२० नीचांकाला
संचालक मंडळातील एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे राऊत यांनी सांगितले. विद्यमान संचालक मंडळातील ७ जणांचा नवीन संचालकांमध्ये समावेश असून, सहा लोकांना नव्याने संधी मिळाली आहे. यांच्या व्यतिरिक्त २५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत माघार घेतल्याने, मतदान घेण्याची गरज भासली नाही.
हेही वाचा >>> Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
निवडून आलेल्या बँकेच्या संचालकांमध्ये, रसिका गुप्ता, सुरेखा जोशी, प्रवीणकुमार गांधी, अजित गिजरे, सुब्रमणियम संथानम, घनश्यामभाई अमिन, अॅड. प्रल्हाद कोकरे, सचिन आपटे, सीए यशवंत कासार, अरविंद तावरे, बाळासाहेब साठे, अनुश्री माळगांवकर आणि रेखा पोकळे यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२४-२५ ते २०२९-३० असा पाच वर्षांसाठी असेल.