पुणेः कॉसमॉस बँकेने १ ऑगस्टपासून सुरू केलेल्या अधिक व्याजदर देऊ करणाऱ्या ‘कॉस्मो मान्सून बोनान्झा’ या नवीन ठेव योजनेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन दिवसांत १३५ कोटींहून अधिक ठेवी बँकेला गोळा करता आल्या, असे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी शुक्रवारी सांगितले.
हेही वाचा >>> स्टेट बँकेचा सलग चौथ्या तिमाहीत नफ्याचा विक्रम; निव्वळ नफा तिपटीने वाढून १६,८८४ कोटींवर
‘कॉस्मो मान्सून बोनान्झा’ ही १५ महिन्यांची मुदत ठेव योजना असून, त्या अंतर्गत सर्व प्रकारच्या ठेवीदारांना ७.७५ टक्के वार्षिक दराने व्याजदर दिला जाणार आहे. ग्राहकांना मासिक, तिमाही अथवा एकत्रित असे व्याज-प्राप्तीचे पर्याय या योजनेत उपलब्ध आहेत. मर्यादित कालावधीकरिता उपलब्ध असलेल्या या ठेव योजनेत आवर्ती ठेव (रिकरिंग) खातेही सुरू करता येते, अशी काळे यांनी माहिती दिली.