Fine on Railways : न्यायालयाने निष्काळजीपणासाठी रेल्वेला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गरीब रथ ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एसी किंवा पंखे सुरू नसल्याची तक्रार एका प्रवाशाने केली होती. त्यामुळे डब्यात हवेचा तुटवडा निर्माण झाला होता. घुटमळणाऱ्या वातावरणात प्रवास करताना त्याला गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी न्यायालयाने दक्षिण मध्य रेल्वेच्या विरोधात निकाल देत दंड ठोठावला.

माहिती देऊनही दिलासा मिळाला नाही

TOI रिपोर्टनुसार, याचिकाकर्ते केव्हीएस अप्पा राव यांनी आरोप केला होता की, त्यांनी एसी आणि पंखे काम करत नसल्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. नुकसानभरपाईसाठी पत्रही लिहिले होते. परंतु कारवाई झाली नाही. त्यावर जिल्हा ग्राहक मंचाने हे स्पष्टपणे निष्काळजीपणाचे आणि सेवांच्या अभावाचे प्रकरण असल्याचे सांगितले. दक्षिण मध्य रेल्वेला विजेचा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे रेल्वेने याचिकाकर्त्याला १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.

Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

राव आपल्या मुलीबरोबर प्रवास करत होते

अप्पा राव ५ एप्रिल २०२३ रोजी आपल्या मुलीसह विशाखापट्टणम ते सिकंदराबाद या प्रवासाला निघाले होते. गरीब रथ ट्रेनमध्ये त्यांनी दोन जागा बुक केल्या होत्या. राव यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेन संध्याकाळी ८.४० वाजता निघाली आणि रात्रीचे जेवण करून ते १० वाजता झोपायला गेले. मात्र, रात्रीच्या वेळी एसी आणि पंखे बंद होते. त्यांनी याबाबत टीटीईला माहिती दिली असता त्यांनी एलुरु स्थानकावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पण ट्रेनमधील पंखे तिथे दुरुस्त करता आले नाहीत. मग विजयवाडा स्टेशनवर सकाळी ही समस्या सुटू शकली. तोपर्यंत सर्व प्रवाशांची अडचण सुरूच होती.

त्यांनी आरटीआयही दाखल केला

राव यांनी आरटीआयही दाखल केला होता. यातून त्यांना ट्रेनचे डिझेल जनरेटर काम करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसी प्लांटचा वीजपुरवठा बंद झाला. यानंतर त्यांनी हैदराबादच्या जिल्हा ग्राहक न्यायालयात खटला दाखल करून दंडाची मागणी केली.

Story img Loader