पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशातील क्रेडिट कार्डची बुडीत कर्जे या वर्षी मार्चअखेरीस ४ हजार ७२ कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. मागील वर्षी मार्चअखेरीस हा आकडा ३ हजार १२२ कोटी रुपये होता, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी मंगळवारी लोकसभेला दिली.
याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध माहिती दिली. त्यानुसार, क्रेडिट कार्डाद्वारे एकूण विनिमय वाढण्याबरोबरच थकीत देणीही वाढली आहेत. मागील वर्षी मार्चअखेरीस क्रेडिट कार्डद्वारे एकूण वितरित कर्ज १.६४ लाख कोटी रुपये होते, जे यंदा मार्चअखेरीस २.१० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. क्रेडिट कार्डच्या एकूण थकिताचे प्रमाण मार्च २०२१ मध्ये ३.५६ टक्के होते. ते मागील वर्षी मार्चअखेरीस १.९१ टक्के आणि यंदा मार्चअखेरीस १.९४ टक्के होते. याच वेळी देशातील व्यापारी बँकांच्या एकूण बुडीत कर्जांचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण मार्चअखेरीस ३.८७ टक्के होते, असे कराड यांनी सांगितले.
हेही वाचा – रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा, सेन्सेक्समध्ये शतकी घसरण
सहकारी बँकांत ७९१ कोटींची फसवणूक
सहकारी बँकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये फसवणुकीच्या ९६४ घटनांची नोंद केली. त्यात एकूण ७९१ कोटी रुपयांची फसवणूक झाली. त्याआधी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अशा ७२९ प्रकरणांमधून ५३६ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती, असे कराड यांनी स्पष्ट केले.