स्वप्नात किंवा बॉलिवूड चित्रपटांमध्ये बऱ्याचदा रातोरात करोडपती झालेले लोक आपण पाहिलेच असतील. प्रत्यक्षात असे क्वचितच घडते, परंतु पाकिस्तानच्या एका मच्छीमारासाठी हे खरे ठरले आहे. वर्षानुवर्षे रोज मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराचे असे अचानक काय झाले, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ माशाने नशीब बदलले

ही सिनेमॅटिक दिसणारी कथा पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या हाजी बलोचबरोबर घडली आहे, जो व्यवसायाने मच्छीमार आहे. हाजी बलोच हा कराचीतील इब्राहिम हैदरी या अत्यंत सामान्य गावातील रहिवासी आहे. अलीकडेच एके दिवशी मासेमारी करताना त्याने एक मासा पकडला, ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. गरिबीत जगणारा हाजी बलोच अचानक करोडपती झाला.

माशाचा वापर औषधांमध्ये केला जातो

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, खरं तर हाजी बलोच आणि त्यांच्या टीमने दुर्मीळ आणि मौल्यवान मासा पकडला. हा मासा सोवा या नावाने ओळखला जातो आणि अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हा मासा हाजी बलोच आणि त्यांच्या टीमसाठी सोन्याचा खजिना ठरला आहे.

हेही वाचाः अधिक रोजगार निर्मितीसाठी भारताला ८ टक्के वाढीची आवश्यकता; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला

लिलावात मिळाला ‘एवढा’ पैसा

पाकिस्तानच्या मच्छीमार लोक मंचाचे प्रतिनिधी मुबारक खान यांचा हवाला देत पीटीआयने म्हटले आहे की, हाजी बलोच आणि त्यांच्या टीमला सापडलेल्या सोवा माशांचा लिलाव शुक्रवारी पहाटे कराची हार्बर पोर्ट येथे झाला. त्याला लिलावात ७० मिलियन पाकिस्तानी रुपये इतकी मोठी रक्कम मिळाली. भारतीय चलनात ही रक्कम २.०५ कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचाः कोळसा विकून ‘ही’ कंपनी बनली मालामाल, तीन महिन्यांत थोडे थोडके नव्हे, तर कमावले ‘इतके’ कोटी रुपये

सोवा मासा म्हणजे काय?

बलोच सांगतात की, ते आणि त्यांच्या टीमने मिळून १० सोवा मासे पकडण्यात यश मिळवले. त्यांना प्रत्येक माशाची किंमत सुमारे ७ दशलक्ष पाकिस्तानी रुपये मिळाली. सोवा मासे ही एक मोठी प्रजाती आहे. हा मासा आकाराने दीड मीटरपर्यंत वाढतो आणि त्याचे वजन २० ते ४० किलोपर्यंत असते. औषधांमध्ये त्याचा वापर होत असून, हा मासा दुर्मीळ असल्याने त्याची किंमत गगनाला भिडलेली असते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crorepati fisherman haji baloch pakistani fisherman fortune changed made a millionaire overnight by sowa fish vrd
Show comments