सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) ही IVR आधारित UPI सोल्यूशन UPI123pay सादर करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. डिजिटल पेमेंट व्हिजन २०२५ अंतर्गत कॅशलेस आणि कार्डलेस सोसायटी तयार करण्यासाठी बँकेने ही सेवा सुरू केली आहे. भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण आणि निमशहरी भागात राहते. आमच्या सुमारे ६३ टक्के शाखा ग्रामीण आणि शहरी भागात आहेत. यामुळे देशातील दुर्गम भागात पीएनबीचा मोठा ग्राहकवर्ग आहे आणि या भागातील मोठ्या संख्येने अजूनही कीपॅड फोन वापरतात, असंही पीएनबीचे एमडी आणि सीईओ म्हणाले. UPI123PAY सुरू केल्यामुळे या ग्राहकांना UPI ची सुविधा मिळेल. यामुळे भारतभरात कोठेही कोणालाही पैसे देणे शक्य होणार आहे. PNB ने सुरू केलेल्या UPI123PAY सेवेसह तुम्ही PNB ग्राहकांचे पैसे इतर बँकांच्या ग्राहकांना देखील हस्तांतरित करू शकणार आहात.

UPI123PAY म्हणजे काय?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) एक 24*7 पेमेंट चॅनेल आहे. हे कोणत्याही वापरकर्त्याला काही सेकंदात रिअल टाइम पेमेंट सुविधा प्रदान करते. सध्या UPI पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला चांगले इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोन आवश्यक आहे. ज्यामध्ये UPI123PAY हा या समस्येवर उपाय आहे. त्याच्या मदतीने कोणत्याही फोनवरून UPI ​​व्यवहार करता येतात. इंटरनेटशिवायही UPI व्यवहार होऊ शकतात.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचाः लाखमोलाचा शेअर! ३० वर्षांपूर्वी ११ रुपयांचा शेअर आता झाला १ लाखाचा, हजार रुपये गुंतवणूक करणारे बनले करोडपती

UPI123PAY कसे वापरायचे?

सर्वप्रथम तुम्हाला बँकेचा IVR क्रमांक ९१८८१२३१२३ डायल करावा लागेल.
त्यानंतर लाभार्थीची निवड करावी लागेल.
त्यानंतर व्यवहाराचे प्रमाणीकरण करावे लागेल.
UPI123PAY अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडू शकतात.

हेही वाचाः LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये १०,००० रुपये गुंतवा, तुम्हाला मॅच्युरिटीवर ३ लाख रुपये मिळणार