सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) ही IVR आधारित UPI सोल्यूशन UPI123pay सादर करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. डिजिटल पेमेंट व्हिजन २०२५ अंतर्गत कॅशलेस आणि कार्डलेस सोसायटी तयार करण्यासाठी बँकेने ही सेवा सुरू केली आहे. भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण आणि निमशहरी भागात राहते. आमच्या सुमारे ६३ टक्के शाखा ग्रामीण आणि शहरी भागात आहेत. यामुळे देशातील दुर्गम भागात पीएनबीचा मोठा ग्राहकवर्ग आहे आणि या भागातील मोठ्या संख्येने अजूनही कीपॅड फोन वापरतात, असंही पीएनबीचे एमडी आणि सीईओ म्हणाले. UPI123PAY सुरू केल्यामुळे या ग्राहकांना UPI ची सुविधा मिळेल. यामुळे भारतभरात कोठेही कोणालाही पैसे देणे शक्य होणार आहे. PNB ने सुरू केलेल्या UPI123PAY सेवेसह तुम्ही PNB ग्राहकांचे पैसे इतर बँकांच्या ग्राहकांना देखील हस्तांतरित करू शकणार आहात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा