Cyber Attack on Taj Hotel: टाटा समूहाच्या मालकीच्या ताज हॉटेल समूहावर ५ नोव्हेंबर रोजी तथाकथित सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी ताज हॉटेलच्या सुमारे १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. हा डेटा परत करण्यासाठी त्याने ५ हजार डॉलर आणि तीन अटीही दिल्या आहेत. ताज हॉटेल्स ग्रुपने सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांनाही या परिस्थितीची माहिती दिली आहे.

हॅकर्सनी ४ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मागितली अन् ‘या’ तीन अटी ठेवा

लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, सायबर हॅकर्सनी ग्राहकांच्या डेटाच्या बदल्यात ताज हॉटेल ग्रुपकडून ४ लाख रुपये (५ हजार डॉलर) पेक्षा जास्त रकमेची मागणी केली आहे. हॅकर्सनी त्यांच्या ग्रुपला डीएनए कुकीज असे नाव दिले आहे. हा डेटा अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. डेटा परत करण्यासाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. सर्वप्रथम त्यांनी चर्चेसाठी उच्चपदस्थ मध्यस्थ आणण्यास सांगितले आहे. तसेच ते तुकड्यांमध्ये डेटा देणार नाहीत, अशी दुसरी अट ठेवली आहे. तिसऱ्या अटीत ते म्हणाले की, आमच्याकडून डेटाचे आणखी नमुने मागू नयेत. या हॅकर्सनी ५ नोव्हेंबर रोजी १००० कॉलम एन्ट्रीसह डेटा लीक केला होता.

cyber fraud, fake e-mails, foreign company,
परदेशी कंपनीला बनावट ई-मेल पाठवून दीड कोटींची सायबर फसवणूक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?
foreign liquor worth Rs 6 lakh seized from tempo on wada shahapur road
वाडा-शहापूर मार्गावर टेम्पोच्या चोरकप्प्यातून सहा लाखाचा विदेशी मद्य साठा जप्त
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
scam of 65 lakhs has been made by keeping entire family in digital arrest in Nagpur
नागपूर : खळबळजनक! संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, तब्बल ६५ लाख…
Cyber ​​Lab Pune, cyber crimes, investigating cyber crimes, Cyber ​​Lab, pune, loksatta news,
नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रणा
A person was cheated online by asking him to pay a monthly subscription for milk thane crime news
ठाणे: ४९९ रुपयांच्या दूधासाठी ३० हजार गमावले

हेही वाचाः बार्कलेज बँक २००० कर्मचाऱ्यांना काढणार; भारतीय कर्मचाऱ्यांवरही परिणाम होणार का?

१५ लाख लोकांचा डेटा धोक्यात!

सुमारे १५ लाख ग्राहकांना या सायबर हल्ल्याचा फटका बसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यांचा पर्सनल नंबर, घराचा पत्ता आणि मेंबरशिप आयडी अशी अनेक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचली आहे. धमकी देणाऱ्या हॅकर्सनी त्यांच्याकडे २०१४ ते २०२० पर्यंतचा डेटा असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचाः Black Friday sale : ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘या’ टिप्स वापरा, फसवणुकीपासून होणार सुटका

IHCL काय म्हणाले?

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला हॅकर्सच्या या दाव्याची माहिती मिळाली आहे. हा डेटा नॉर्मल आहे आणि या डेटामध्ये काहीही संवेदनशील नाही. कंपनीला आपल्या ग्राहकांच्या डेटाची काळजी आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची चौकशी करीत आहोत. आम्ही ही बाब सायबर सुरक्षा एजन्सी आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांनाही कळवली आहे. याशिवाय कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेचीही चौकशी करण्यात येत आहे. ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. IHCL ताज, विवांता, जिंजर यासह हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनेक ब्रँड चालवते.

Story img Loader