डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी रिटेल चेन असलेल्या ‘हेल्थ अँड ग्लो’ कंपनीचे अधिग्रहण केले आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दमानी यांनी बंगळुरूस्थित ‘हेल्थ अँड ग्लो’ कंपनी राजन रहेजा आणि हेमेंद्र कोठारी यांच्याकडून ७००-७५० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. २०१५ मध्ये बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स विकत घेतल्यानंतर देशातील सर्वात जुने किरकोळ विक्रेते दमानी यांचे हे दुसरे मोठे अधिग्रहण आहे. या स्टोअरची स्थापना स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक, मनमोहनदास रामजी आणि उद्योगपती जेआरडी टाटा यांनी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेल्थ अँड ग्लोची देशात १७५ हून अधिक स्टोअर्स

हेल्थ अँड ग्लोचे पहिले स्टोअर १९९७ मध्ये चेन्नई येथे उघडण्यात आले. यानंतर कंपनीने बंगळुरू, पुणे, मुंबई, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर आणि हैदराबादसह इतर शहरांमध्ये १७५ हून अधिक स्टोअर्स उघडली आहेत.

Nykaa सह इतर ब्रँड्सना टक्कर मिळणार

मार्केट रिसर्च फर्म युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, २०२३ च्या अखेरीस भारतातील सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी वस्तूंच्या कंपनीचे बाजारमूल्य १८.३ अब्ज डॉलर म्हणजेच १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. या व्यवसायात दमानीच्या प्रवेशामुळे Nykaa सारख्या ब्रँडला स्पर्धा निर्माण होणार आहे.

हेही वाचाः ओल्ड मॉन्क कशी बनली जगातील आयकॉनिक ‘रम’, मद्य बनवणाऱ्या ब्रिगेडियर कपिल मोहन यांची रंजक कहाणी

पहिल्या तिमाहीत कंपनीला ६५८.७१ कोटींचा एकत्रित नफा

D-Mart चालवणारी कंपनी Avenue Supermarts Limited ने गेल्या आठवड्यात आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ६५८.७१ कोटी होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत ६४२.८९ कोटी होता. यासह कंपनीचे एकत्रित उत्पन्न १८.२ टक्क्यांनी वाढून ११,८६५.४४ कोटी रुपये झाले, जे २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १०,५९४.११ कोटी रुपये होते. याशिवाय कंपनीने या तिमाहीत ३ नवीन स्टोअर्स उघडली आहेत. ३० जूनपर्यंत कंपनी ३२७ स्टोअर्स चालवते.

हेही वाचाः EPFO Update : मे महिन्यात नोकरदार कर्मचाऱ्यांची संख्या घटली, १६.३० लाख कर्मचारी ईपीएफओशी जोडले गेले

डी-मार्टचे पहिले स्टोअर २००२ मध्ये मुंबईत उघडले

डी-मार्टचे पहिले स्टोअर २००२ मध्ये मुंबईत उघडले. यापूर्वी १९९९ मध्ये दमानी यांनी नेरूळ, नवी मुंबई येथे ‘अपना बाजार’ फ्रँचायझी सुरू केली होती, परंतु त्यांच्याकडे योग्य मॉडेल नव्हते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D mart founder radhakishan damani bought health and glow now to compete with brands like nayak vrd