RBI MPC Meeting Today : भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)च्या चलनविषयक धोरण समिती (MPC)मध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नवीन पतधोरण जाहीर केले. ८ ते १० ऑगस्टदरम्यान झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेपो दर तिसऱ्यांदा स्थिर ठेवला

चलनविषयक धोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.आज पुन्हा एकदा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सध्या रेपो दर ६.५ टक्केच राहील. ६ सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय, त्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.

mahada house prices increased instead of decreasing
म्हाडा घरांच्या किमतीत वाढ, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
question of alternative to POP idol remains unsolved
पीओपी मूर्तींच्या पर्यायाचा प्रश्न अनुत्तरितच
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
213 flats in kalamboli kharghar and ghansoli most demanded in cidco maha housing lottery
सिडकोचे खारघरचे घर २ कोटींना; पहिल्याच दिवशी १२०० इच्छुकांची नोंदणी
mhada redevelopment project house cheaper
म्हाडाची घरे आता स्वस्त; वरळी, ताडदेवमधील घरांच्या किमतीत कपात

हेही वाचाः Money Mantra : प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्डची संपूर्ण मर्यादा संपवताय; मग तोटा सहन करावा लागणार, उपाय काय?

रेपो दरात शेवटचा बदल कधी झाला

RBI ने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारीमधील रेपो दरातील या बदलासह मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच २.५ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा तिमाहीत रेपो दरात झालेल्या वाढीमुळे गृहकर्ज घेणारे प्रचंड नाराज आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केली होती. आता महागाई उच्च पातळीवरून खाली आली आहे. परंतु ती ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचाः आयुष्यमान भारत योजनेत ७.५ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून कार्ड बनवले, कॅगने लोकसभेत केला धक्कादायक खुलासा

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज वाढवला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये रेपो दर कमी होण्याची आशा नाही. या वर्षाच्या अखेरीस रिटेल चलनवाढीचा दर आरबीआयच्या उद्दिष्टापर्यंत आला तर केंद्रीय बँक पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपूर्वी रेपो दर कमी करणार नाही. याचा अर्थ तोपर्यंत तुमचा EMI सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे.