पीटीआय, लंडन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीतप्रेमींसाठी त्यांच्या पसंतीच्या संगीताचे वहन सेवा देणाऱ्या स्पॉटीफाय या कंपनीने जागतिक मनुष्यबळात १७ टक्के कपात करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. कंपनीची ही कर्मचारी कपातीची तिसरी फेरी असून, खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

स्पॉटीफायचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिएल एक यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना संदेश पाठविला आहे. कंपनीची पुनर्रचना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही कपात करण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार हे त्यांनी जाहीर केले नाही. मात्र, कंपनीच्या प्रवक्त्याने १७ टक्के म्हणजेच दीड हजार कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ठाणे : घोडबंदर, माजिवडा प्रवास नकोसा

हेही वाचा – ठाणे : अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा वाशीत, ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजन

स्पॉटीफायने यंदा सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत ५० कोटी डॉलरचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात तिचे सहा टक्के मनुष्यबळ कमी केले होते. त्यानंतर जून महिन्यात आणखी दोन टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. आता मनुष्यबळ कपातीची तिसरी फेरी कंपनीकडून सुरू आहे, त्यात तब्बल १७ टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम यासारख्या महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांनी यावर्षी लाखो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision to remove one and a half thousand employees from spotify ssb
Show comments