जगातील काही लोकांना त्यांच्या शारीरिक व्यंगामुळे अनेकदा लोकांकडून टोमणे ऐकावे लागतात. अशा परिस्थितीत पुढे जाणे त्यांच्यासाठी वाटते तितके सोपे नसते. पण गेल्या काही वर्षांत काही जणांनी यशाची अनेक उदाहरणं समोर ठेवली आहेत. कधी काळी त्यांच्यावर हसणाऱ्यांची त्यांनी आज स्वकर्तृत्वाने बोलती बंद केली आहे. या यशस्वी व्यक्तिमत्त्वांमध्ये IAS इरा सिंघल आणि आरती डोग्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे. कॉर्पोरेट जगतात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या आणखी एका महिलेची यशोगाथा आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एडलवाइस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बिझनेस मॅगझिन आणि चॅनेल्समध्ये गुंतवणुकीसंदर्भात सल्ले देताना तुम्ही त्यांना अनेकदा ऐकले असतील. आता त्या शार्क टँक इंडिया या बिझनेस रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. आज त्या ज्या स्थानावर पोहोचल्या आहेत, त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी राधिक गुप्ता यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, विशेषत: त्याच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांना नकार सहन करावा लागला.

मान मोडली पण हिंमत हरल्या नाहीत

बालपणी राधिका गुप्ता यांना त्यांच्या वाकड्या मानेमुळे शाळेत मुलांच्या चेष्टेला बळी पडावे लागले होते. त्यांचे वडील मुत्सद्दी होते, त्यांनी अनेक देशांमध्ये शिक्षण घेतले. त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला. जन्मादरम्यान काही गुंतागुंत झाल्यामुळे त्यांची मान मोडली होती, त्यामुळे त्यांची मान एका बाजूला थोडीशी वाकलेली होती. शाळेत शिकत असताना राधिका गुप्तांच्या वाकड्या मानेमुळे मुले अनेकदा त्यांची चेष्टा करायचे. तेव्हा राधिका नाराज झाल्या होत्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही.

हेही वाचाः विप्रो कर्मचाऱ्यांनो वर्क फ्रॉम होम विसरा, आता आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात यावे लागणार, हायब्रीड वर्क पॉलिसी लागू

वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ बनल्या

या कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करत राधिका गुप्ता यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत राहून त्यांनी संगणकशास्त्रात पदवी मिळवली. नोकरीतही पुढचा मार्ग सोपा नव्हता. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मुलाखतीत ७ वेळा रिजेक्ट झाल्यानंतर माझी हिंमत जवळपास संपली होती. यामुळे वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला. मात्र, त्यानंतर त्यांनी हिंमत दाखवून नोकरी मिळवली.

हेही वाचाः Money Mantra : यंदाच्या धनत्रयोदशी किंवा दिवाळीला सोन्यात पैसे गुंतवणे ठरणार फायदेशीर, गणित समजून घ्या

राधिका गुप्ता वयाच्या २५ व्या वर्षी भारतात आल्या होत्या. येथे त्यांनी पती आणि मित्राबरोबर मिळून एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी सुरू केली. काही वर्षांनंतर त्यांची कंपनी एडलवाईस एमएफने विकत घेतली. यानंतर २०१७ मध्ये वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी ती ९१२८ कोटी रुपयांच्या फंड हाऊसच्या त्या सीईओ बनल्या. जानेवारी २०२३ पर्यंत त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन फर्मची किंमत १,०१,४०६ कोटी रुपये झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite suffering many insults the confidence did not waver ceo of 1 lakh crore company today with great hard work who is edelweiss mf ceo radhika gupta vrd
Show comments