घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी “तक्रार निवारण कक्षाची” ( Grievance Redressal Cell ) स्थापना करावी, असे आवाहन महारेराने एका परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना केले आहे. या कक्षात याच कामासाठी समर्पित किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी ठळकपणे प्रदर्शित करावे. शिवाय विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरुवातीला घर खरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची पणन यंत्रणा ग्राहकांच्या संपर्कात असते. नंतर काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते. अशावेळी त्या ग्राहकाने कुठे जावे हे त्याला कळत नाही . परिणामी त्याची तक्रार सोडवून घेण्यात त्याला अडचणींना सामोरे जावे लागते. यातून अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्णतेतही अडचणी येऊ शकतात.

हेही वाचाः ‘या’ अब्जाधीशाची पत्नी होती टाटा मोटर्सची पहिली महिला अभियंता, जेआरडी टाटांना लिहिले संतप्त पत्र अन् घडला ऐतिहासिक बदल

यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्यास तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळणार असल्याने हा प्रश्न नियंत्रणात राहू शकतो, असे महारेराच्या निदर्शनास आलेले आहे. शिवाय तसे अभिप्रायही महारेराला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्राप्त झालेले आहेत. म्हणून महारेराने एका विशेष परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना समर्पित ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. या विकासकांनी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले, याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकावा. यामुळे प्रकल्पाची विश्वासार्हता वाढायला मदत होणार आहे.

हेही वाचाः तेल कंपन्यांना दोन आठवड्यात दुसरा झटका, कच्च्या पेट्रोलियमवर विंडफॉल कर वाढवला, पेट्रोल अन् डिझेल महागणार?

जानेवारी २३ पासून महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पांचे मानांकन ( Grading) काही निकषांच्या आधारे जाहीर करण्याचे महारेराने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यात प्रकल्पनिहाय समर्पित तक्रार निवारण कक्षाची स्थापना हाही महत्वाचा निकष राहील, असे महारेराने जाहीर केले आहे.