Dhanteras Gold Silver Rate Today : सध्या देशभरात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा सण असतो. पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. आज २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्याचा दर जाणून घ्या.
गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात उच्चांकी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे येत्या दिवसात सोने चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,१८८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,७५० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९७७ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,६५० रुपये प्रति किलो आहे. एक महिन्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७५, ७६० रुपये होता पण ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीचे दर महागले आहे.

Diwali 2024 gold silver price drop in india
Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Gold Silver Price Today 05 November 2024 in Marathi
Gold Silver Rate Today : दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; कुठे किती भाव घसरले? जाणून घ्या
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,०५९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,६१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०५९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०५९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०५९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६१० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा : Trigrahi Yog : १०० वर्षानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणार त्रिग्रही योग, या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा!

शुद्ध सोने कसे ओळखावे?

  • सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्कवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) चे चिन्ह असणे आवश्यक असते. हे चिन्ह त्रिकोणी असते.
  • धातुची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्कवरील कॅरेटेज (22K915) तपासा.
  • हॉलमार्कवर ज्वेलर्सचे चिन्ह, हॉलमार्किंग सेन्टरचे चिन्ह किंवा क्रमांक योग्य आहे का तपासणे आवश्यक असते.
  • त्या ज्वेलर्सचा आयडेनटीफिकेशन नंबर काय आहे ते शोधून, तो नंबर आणि हॉलमार्कवरील नंबर सारखा आहे का ते तपासा.
  • बीआयएस गाईडलाइन्सनुसार तुम्ही ज्वेलर्सचा पत्ता आणि त्यांच्या लायसन्सवरील पत्ता सारखा आहे का तपासणे गरजेचे आहे.
  • एसे हॉलमार्किंग सेंटरकडुन निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि तुमच्याकडुन आकरण्यात आलेली रक्कम सारखी आहे का हे तपासण्यासाठी नेहमी दागिने विकत घेतल्यानंतर त्याचे बिल घ्यावे.

Story img Loader