हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या उत्पादनात माहीर असलेल्या आणि दागिन्यांच्या उद्योगातील आघाडीच्या कंपनीपैकी एक किरण जेम्सने सूरतमधील कामकाज बंद करून मुंबईला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर हे पाऊल सूरत डायमंड बोर्ससारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या हिरे व्यापाऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सूरत डायमंड बोर्स (SDB) चे उद्घाटन केले होते, परंतु त्याच्या अवघ्या एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे. त्यांनी सोमवारी आपला व्यवसाय मुंबईला हलवल्याची माहिती दिली.

सूरतहून मुंबईत स्थलांतरित

फ्री प्रेस जनरलच्या वृत्तानुसार, दोन महिन्यांपूर्वी किरण जेम्सने त्यांच्या लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात सूरत डायमंड बाजार येथे त्यांचे ट्रेडिंग हब दाखवले होते. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हिऱ्यांचे उत्पादक असलेल्या किरण जेम्स यांचे जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र सूरत डायमंड बोर्सच्या मुख्यालयात स्वागत करीत आहोत.”

कंपनीबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या

१४ सप्टेंबर २००७ रोजी स्थापन झालेली किरण जेम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातील मुंबईच्या मध्यभागी कार्यरत असलेली असूचीबद्ध खासगी कंपनी आहे. ७१ कोटी रुपयांचे नोंदणीकृत भांडवल आणि २०.९८ कोटी रुपयांचे पेड-अप भांडवल असलेली कंपनी खासगी मर्यादित संस्था म्हणून वर्गीकृत आहे. २०२१ च्या आर्थिक वर्षात ५०० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवणारी किरण जेम्स दागिने, हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या उत्पादनात माहीर आहे.

हेही वाचाः गुजरातच्या ‘किरण जेम्स’ यांची पुन्हा मुंबईवापसी; सूरत डायमंड बोर्स आपली चमक गमावणार

मालकी आणि ऑपरेशन्स

किरण जेम्सची स्थापना वल्लभभाई पटेल यांनी केली होती. वल्लभभाई शामजीभाई पटेल यांनी कंपनीच्या स्थापनेमध्ये आणि विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या उत्पादकांपैकी ही एक कंपनी बनला. कंपनीमध्ये सध्या चार संचालक आणि एक प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी आहे. सर्वात जास्त काळ कार्यरत असलेल्या संचालकांमध्ये वल्लभभाई शामजीभाई पटेल आणि मावजीभाई शामजीभाई पटेल यांचा समावेश आहे, दोघेही १४ सप्टेंबर २००७ रोजी नियुक्त झाले होते आणि त्यांनी १६ वर्षांहून अधिक काळ संचालक मंडळावर काम केले होते.

वल्लभभाई शामजीभाई पटेल आणि मावजीभाई शामजीभाई पटेल यांच्या निवृत्तीनंतर १८ सप्टेंबर २००७ रोजी बाबूभाई शामजीभाई लखानी आणि दिनेश मावजीभाई लखानी यांची बोर्डात नियुक्ती करण्यात आली. मावजीभाई शामजीभाई पटेल यांच्याकडे एकूण पाच कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे असून, इतर संचालकपदेसुद्धा आहेत.

आर्थिक कामगिरी

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये किरण जेम्सचा परिचालन महसूल ५०० कोटींहून अधिक होता आणि त्यांच्या EBITDA मध्ये १०१.७८ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली होती. त्यांच्या निव्वळ संपत्तीत त्याच कालावधीत १६.११ टक्क्यांची चांगली वाढ झाली.

Story img Loader