पीटीआय, नवी दिल्ली

करदात्यांच्या वैयक्तिक उत्पादनात वाढ झाल्याने विद्यमान आर्थिक वर्षात १० ऑगस्टपर्यंत देशाचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत १५.७३ टक्क्यांनी वाढून ६.५३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करदात्यांना दिला गेलेला परतावा (रिफंड) वजा केल्यास, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ५.८४ लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा १७.३३ टक्क्यांनी अधिक राहिले आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी दिली.

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
National Health Policy What percentage of expenditure from the public health fund from the budget
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, आरोग्यावर फक्त ४.९१ टक्के खर्च ; ‘कॅग’चे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे
9 percent growth in employment expected in the country highest opportunities in IT telecom retail
देशातील रोजगारांत ९ टक्के वाढ अपेक्षित; आयटी, दूरसंचार, रिटेलमध्ये सर्वाधिक संधी
direct tax collection
प्रत्यक्ष कर संकलनातून केंद्राच्या तिजोरीत १५.८२ लाख कोटींचा महसूल
Kalyan Dombivli Municipal corportion,
कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान

आणखी वाचा-गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ‘रास्त मुल्यांकन मानदंडा’चे युनियन म्युच्युअल फंडाकडून अनावरण

जागतिक पातळीवर प्रतिकूल वातावरण असतानादेखील आर्थिक क्रियाकलापांमध्ये गतिमानता कायम आहे. आर्थिक वर्षात आजवर प्रत्यक्ष करांचे संकलन अंदाजपत्रकीय उद्दिष्टाच्या ३२.०३ टक्के इतके झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांनी कर संकलनामध्ये वाढीस हातभार लावला आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’रूपी अप्रत्यक्ष करांच्या संकलनात चढती भाजणी सुरू असल्याने चालू आर्थिक वर्षांतदेखील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ओलांडले जाण्याची आशा आहे. जीएसटीची अंमलबाजवणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलन हे १.५० लाख कोटी रुपयांहून अधिक आणि चौथ्यांदा १.६० लाख कोटींहून अधिक नोंदवले गेले आहे.

६९ हजार कोटी परतावा वितरित

केंद्र सरकारकडून १ एप्रिल २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ या कालावधीत करदात्यांना ६९,००० कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) वितरित करण्यात आला आहे. जो मागील वर्षाच्या याच कालावधीत वितरित केलेल्या परताव्याच्या तुलनेत ३.७३ टक्के अधिक आहे.

Story img Loader