पीटीआय, नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन २२.०७ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष रवी अगरवाल यांनी सोमवारी व्यक्त केला. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये करदाते दालनाचे उद्घाटन केल्यानंतर अगरवाल बोलत होते. ते म्हणाले की, प्राप्तिकर विवरणपत्रात परदेशातील संपत्तीचे तपशील न देणाऱ्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सुधारित विवरणपत्रे भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली गेली आहे. उच्च मूल्य मालमत्तांचे तपशील विवरणपत्रात न देणाऱ्या करदात्यांना लघुसंदेश आणि ई-मेल पाठविण्याची प्रक्रिया प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. यंदा अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा प्रत्यक्ष कर संकलन अधिक असेल, असा आमचा विश्वास आहे. कंपनी कर आणि बिगरकंपनी करात झालेली वाढ यास कारणीभूत ठरेल.

प्राप्तिकर कायद्यातील भाषा सोपी आणि सहजपणे समजणारी असावी, यासाठी करदात्यांच्या सूचना व हरकत्या मागविल्या गेल्या. आतापर्यंत सहा हजारांहून अधिक सूचना आमच्याकडे आलेल्या आहेत. करदात्यांना पुढे येऊन त्यांना प्राप्तिकर कायद्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवावेत. त्यांच्या सूचनांच्या आधारे आम्ही प्राप्तिकराची जगातील उत्कृष्ट पद्धती आणली जाईल, असेही अगरवाल यांनी स्पष्ट केले.

moody forecasts indian economy
मूडीजला ७.२ टक्के अर्थवेगाचा विश्वास
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?

हेही वाचा : Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण! खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

निव्वळ संकलन १२.११ लाख कोटींवर

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १० नोव्हेंबर या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १५.४१ टक्क्यांनी वाढून १२.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यात निव्वळ कंपनी कर ५.१० लाख कोटी रुपये आणि बिगरकंपनी कर ६.६२ लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये रोखे उलाढाल कराचा (एसटीटी) वाटा ३५,९२३ कोटी रुपये आहे.