पीटीआय, नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन २२.०७ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक होईल, असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष रवी अगरवाल यांनी सोमवारी व्यक्त केला. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये करदाते दालनाचे उद्घाटन केल्यानंतर अगरवाल बोलत होते. ते म्हणाले की, प्राप्तिकर विवरणपत्रात परदेशातील संपत्तीचे तपशील न देणाऱ्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सुधारित विवरणपत्रे भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली गेली आहे. उच्च मूल्य मालमत्तांचे तपशील विवरणपत्रात न देणाऱ्या करदात्यांना लघुसंदेश आणि ई-मेल पाठविण्याची प्रक्रिया प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. यंदा अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा प्रत्यक्ष कर संकलन अधिक असेल, असा आमचा विश्वास आहे. कंपनी कर आणि बिगरकंपनी करात झालेली वाढ यास कारणीभूत ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा