मुंबई : प्रसिद्ध ‘मॅगी’ नूडल्सची निर्मात्या ‘नेस्ले’ने समभाग विभाजनाचा मंगळवारी निर्णय घेतला. सध्या १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागाचे १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १० समभागांमध्ये विभाजन होत असून, त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत (रेकॉर्ड तारीख) कंपनीचे समभाग हाती असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील प्रत्येक समभागामागे कंपनीचे दहा समभाग प्राप्त होतील. समभाग विभाजनाच्या तारखेच्या निश्चितीच्या मंगळवारी झालेल्या या घोषणेने शेअर बाजारात ‘नेस्ले’च्या समभागाने ४.६६ टक्क्य़ांपर्यंत मूल्यवाढ साधली. सत्रात त्याने २५,७०५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर समभाग २५,४८९.७० रुपयांवर बंद झाला.
समभागांचे विभाजनाचे फायदे काय?
‘नेस्ले’च्या समभाग विभाजनामुळे किमतीला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. कारण समभाग आधीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असल्याने जास्त तरलता आणि गुंतवणूकदारांची संख्याही वाढते.