जगात खूप कमी लोक आहेत, जे संपूर्ण संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना वाटून टाकतात आणि घरी आरामात बसतात. होय, आज आपण श्रीराम ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल बोलत आहोत. ज्यांनी आपली हजारो कोटींची संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटली. ते प्रामुख्याने त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. खरं तर त्यांनी जी संपत्ती कमावली, त्यातून त्यांनी गरिबांनाही कर्ज वाटप केले आहे. ते अशा लोकांना कर्ज देतात, ज्यांना बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला होता. त्या लोकांना कर्ज देताना त्यांनी त्यांचा सिबिल स्कोर तपासला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६२१० कोटी रुपये वितरित केले

खरं तर आज आर त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली. तसेच त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य ७१,२५५.३४ कोटी रुपये आहे.

एक लाख लोक काम करतात

ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या भारतातील गरिबांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेले आर त्यागराजन यांनी स्वत:ला एक समूह म्हणून स्थापित केले आहे, जे सुमारे १०८,००० लोकांना विम्यापासून स्टॉक ब्रोकिंगपर्यंतच्या क्षेत्रात सेवा प्रदान करतात. अनेक लोकांना रोजगार देतात. श्रीराम फायनान्सचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत जवळपास ३३ टक्क्यांनी वाढले आहेत. श्रीराम फायनान्स हा त्याच्या गेल्या तीन वर्षांच्या परताव्याच्या दृष्टीने एक बहु-बॅगर स्टॉक आहे, कारण गेल्या तीन वर्षांत स्टॉक १७० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

हेही वाचाः ”भारत जगाचे ग्रोथ इंजिन बनणार, GDP वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम”; RBI चा विश्वास

खराब क्रेडिट इतिहास असलेल्यांना कर्ज देणे धोक्याचे नाही

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या लोकांना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या उद्योगात प्रवेश केला. व्यवसायाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात सामान्य आहे, असंही ते सांगतात. कोलकाता येथील प्रतिष्ठित इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (ISI) मध्ये तीन वर्षे घालवण्यापूर्वी आर त्यागराजन यांनी चेन्नईमध्ये गणितात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९६१ मध्ये ते न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीत रुजू झाले आणि एक कर्मचारी म्हणून त्यांनी फायनान्स क्षेत्रात सुमारे २० वर्षांचे करिअर सुरू केले.

हेही वाचाः RBI MPC Meet : कर्जदारांना दिलासा! RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही, रेपो रेट ६.५० टक्क्यांवर स्थिर

आर त्यागराजन यांची जीवनशैली

त्यागराजन यांनी बहुतांशी लोकांमध्ये राहणे पसंत केले आहे. वर्षानुवर्षे त्यांनी ह्युंदाई हॅचबॅक कार चालवली. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे मोबाईल फोन नाही, कारण त्यांना तो विचलित करणारा वाटतो. बिझनेस टायकून त्यागराजन यांनी श्रीराम कंपन्यांमधील त्यांचे संपूर्ण शेअरहोल्डिंग कर्मचार्‍यांच्या गटाला दिले आणि २००६ मध्ये स्थापन केलेल्या श्रीराम ओनरशिप ट्रस्टकडे हस्तांतरित केले. कायमस्वरूपी ट्रस्टमध्ये ४४ गट अधिकारी लाभार्थी आहेत. अधिकारी निवृत्त झाल्यावर त्यांना लाखो डॉलर्स मिळतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know a philanthropist donates his entire wealth of 6210 crores to employees who is r thyagarajan vrd
Show comments