World Richest Person in History : आपण अनेकदा जगातील श्रीमंत लोकांबद्दल ऐकत असतो, परंतु जर आपण इतिहासावर नजर टाकली तर असे लोक आहेत, ज्यांच्याकडे सध्याच्या सर्वात श्रीमंत लोकांपेक्षा जास्त संपत्ती होती. आज आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची संपत्ती आधुनिक काळातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपेक्षा दुप्पट आहे. आपण बोलत आहोत १४ व्या शतकातील आफ्रिकन सम्राट मानसा मुसा यांच्याबद्दल
मानसा मुसा हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. त्यांचा जन्म इसवी सन १२८० मध्ये झाला. त्याने पश्चिम आफ्रिकेच्या मोठ्या माली साम्राज्यावर काही काळ राज्य केले. १३१२ इसवी सनमध्ये मानसा मुसाचा राज्याभिषेक झाला आणि त्याची संपत्ती सुमारे ४०० अब्ज डॉलर होती, असा अंदाज आहे. ही निव्वळ संपत्ती सध्याचा सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यापेक्षा दुप्पट आहे.
सम्राट औदार्य आणि दयाळूपणासाठी प्रसिद्ध होता
मानसा मुसा त्याच्या औदार्य आणि दयाळूपणासाठी प्रसिद्ध होता. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण इतिहासात कौतुक झाले. या सम्राटाकडे नैसर्गिक संसाधने असलेले मोठे क्षेत्र होते, त्यामुळे त्याची संपत्ती खूप वाढली. बांबूका, वांगारा, बुरे, गलम, तगाजा आणि इतर सोन्याच्या खाणींची राज्ये त्यांच्याकडे होती. याशिवाय मुसाने आयव्हरी कोस्ट, सेनेगल, माली आणि बुर्किना फासोसह अनेक समकालीन आफ्रिकन देशांवर राज्य केले. त्यावेळी त्याच्या देशाची राजधानी टिंबक्टू होती.
हेही वाचाः विश्लेषण: सरकारकडून EPFO च्या व्याजदरात वाढ; आतापर्यंत वाढ का रोखली होती?
हज यात्रेसाठी १८ टन सोने नेले
मानसा मुसा १३२४ मध्ये हज यात्रेसाठी मक्केला गेला होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, आफ्रिकेतील सहारा वाळवंट पार करणारा त्यांचा कारवाँ आतापर्यंतचा सर्वात मोठा कारवाँ होता. मानसा मुसा १०० उंट, प्रचंड सोने, १२००० नोकर आणि ६०,००० गुलामांसह मक्का, सौदी अरेबियाला गेला होता, असे म्हटले जाते. इतिहासकार आणि विद्वानांच्या मते, त्याने हज यात्रेसाठी १८ टन सोने वाहून नेले असावे, ज्याची किंमत २०२२ मध्ये यूएस ९५७ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त होती.
हेही वाचाः येत्या ५ वर्षांत निफ्टी आणि सेन्सेक्स दुप्पट होणार; ‘मोतीलाल’च्या रामदेव अग्रवाल यांचं सूचक विधान
एलॉन मस्क यांच्याकडे किती मालमत्ता?
सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आहे, ज्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. आता त्यांची एकूण संपत्ती २४२.४ अब्ज डॉलर आहे. ते टेस्ला लक्झरी कार कंपनी आणि स्पेसएक्सचे सीईओ आहेत. याशिवाय त्यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही विकत घेतले आहे. फोर्ब्सच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असून, यांची संपत्ती २३५.१ अब्ज डॉलर आहे.