Gold Silver Today’s Rate : सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ उतार दिसून आले. काही वेळा सोने चांदीचे दर घसरले तर काही वेळा सोने चांदीच्या दराने विक्रमी पातळ गाठली. सध्या सोने चांदीच्या दरात किरकोळ घसरण होत असून महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. आज सुद्धा सोन्याचे दर ४२० रूपयांनी वाढले असून चांदीचे दर स्थिर आहे. सोने चांदीचे दर सविस्तर जाणून घेऊ या.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,४३८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,७५० रुपये आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आजचा चांदीचा दर स्थिर आहे . १० ग्रॅम चांदीची किंमत ९१४ रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,४३० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

Gold Silver Price Today 27 September 2024
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त?जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव…
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
IPO
जागतिक स्तरावर आयपीओच्या माध्यमातून ८२२ कंपन्यांकडून ६५ अब्ज डॉलरची निधी उभारणी
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का! जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
gold price decreased in nagpur
गणराय पावले….. पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…….
Gold-Silver Price today 8 September 2024
Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर

हेही वाचा : Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा, दोन वर्षांत पाच जणांनी सोडली कंपनी!

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,३०९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,६१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०२५ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

हेही वाचा : व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता; पतधोरण समितीच्या तीन बाह्य सदस्यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपणार

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातुंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.