7th Pay Commission : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांत केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याबरोबरच एचआरएसुद्धा वाढवू शकते. यापूर्वी मार्च महिन्यात डीएमध्ये वाढ झाली होती आणि दोन वर्षांपूर्वी जुलै २०२१ मध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए २५ टक्के होता. सध्या डीए एका विशिष्ट पातळीवर पोहोचला आहे, अशा परिस्थितीत एचआरएमध्येही बदल अपेक्षित आहे.

HRA वाढण्याची शक्यता

रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा घरभाडे भत्ता लवकरच वाढवला जाऊ शकतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्‍यांचा HRA ते कोणत्या शहरात काम करत आहेत, यावर आधारित आहे. त्यांचे X, Y आणि Z अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते. सध्या Z श्रेणीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा HRA त्यांच्या मूळच्या वेतनाच्या ९ % आहे.

Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?

HRA मध्ये किती वाढ होणार?

रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा एचआरए लवकरच ३ टक्क्यांनी वाढू शकतो. X वर्ग शहरांमधील केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या HRA मध्ये ३ टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे, तर Y वर्ग शहरांमधील कर्मचार्‍यांना फक्त २ टक्के आणि झेड श्रेणीतील शहरातील कर्मचार्‍यांना त्यांच्या HRA मध्ये १ टक्के वाढ मिळू शकते.

हेही वाचाः Money Mantra : महिलांनो, तुम्ही योग्य नियोजन करूनही पैसे वाचवू शकता; ‘या’ स्मार्ट टॅक्स सेव्हिंग टिप्स फॉलो करा

डीएही वाढेल

केंद्रीय कर्मचारी बर्‍याच दिवसांपासून १ जुलैची वाट पाहत आहेत, कारण हीच तारीख होती, जेव्हा त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार होती. जुलै महिन्यापासून सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. याचा अर्थ डीएमध्ये ४ टक्के वाढ होऊ शकते. मे महिन्याचा डीए स्कोअर जाहीर झाला आहे. AICPI निर्देशांकानुसार, मे महिन्याच्या स्कोअरमध्ये ०.५० अंकांची वाढ झाली आहे.

हेही वाचाः खुशखबर! आता डेबिट कार्डशिवाय कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार, ‘या’ बँकेनं दिली मोठी सुविधा

DA ची गणना कशी केली जाते?

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा डीए अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (AICPI) च्या आधारावर निश्चित केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी AICPI क्रमांक जारी केले जातात. या आकड्यांवर आधारित DA स्कोअर दर ६ महिन्यांनी सुधारित केला जातो. २००१ = १०० पर्यंत CPI (IW) मे महिन्यात १३४.७ वर होता, तर एप्रिलमध्ये तो १३४.०२ वर आला. AICPI निर्देशांकात ०.५० अंकांची वाढ झाली आहे.