Narayan Murthy Deepfake Video: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या ७० तासांचा कामाचा आठवडा या विधानानंतर आता एका दिवसात ३००० डॉलर्स म्हणजे साधारण अडीच लाखाची कमाई करण्याचे विधान चर्चेत आले आहे. पण या व्हिडिओमागील सत्य काय आहे याबाबत गुरुवारी स्वतः मूर्ती यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

या व्हिडिओबाबत लिहिताना मूर्ती म्हणतात की, “मागील काही महिन्यांत, सोशल मीडिया अॅप्सद्वारे आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विविध वेबपेजवर अनेक बनावट बातम्या प्रसारित केल्या गेल्या आहेत ज्यात दावा केला आहे की मी BTC AI Evex, British Bitcoin Profit, Bit Lyte Sync, Immediate Momentum नावाच्या ऑटोमेटेड ट्रेडिंग ॲपला मान्यता दिली आहे किंवा त्यात गुंतवणूक केली आहे. या बातम्या ज्या वेबसाइट्सवर प्रकाशित झाल्या त्याच मुळात फसव्या दिसत आहेत. काही डीपफेक फोटो व व्हिडीओ बनवून त्यांनी बनावट मुलाखती सुद्धा प्रकाशित केल्या आहेत, मी अशा कोणत्याही योजनेशी संबंधित नाही किंवा त्याचे समर्थन करत नाही.”

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गुंतवणूक प्लॅटफॉर्म “क्वांटम एआय” ची जाहिरात मूर्ती यांचा आवाज वापरून केली जात होती यामध्ये एका दिवसात अडीच लाखाची कमाई केली जाऊ शकते असेही सांगण्यात आले होते. या व्हायरल होत असलेल्या दोन डीपफेक व्हिडिओंनंतर मूर्तीचे स्पष्टीकरण आले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मूर्ती असे म्हणताना दिसतात की, “आज मला आमचा नवा प्रोजेक्ट इलॉन मस्कसह सादर करायचा आहे. Quantum AI हे माझ्या टीमने आणि इलॉनच्या टीमने ९४ टक्के यश दराने विकसित केलेले जगातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग सॉफ्टवेअर आहे.” यामध्ये पुढे लोकांना ‘क्वांटम एआय’ मध्ये सामील होण्याचे आवाहन करत असा दावा करण्यात आला आहे की ते त्यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी $3,000 पर्यंत कमवू शकतात.

तुम्ही सुद्धा ही क्लिप बनावट असल्याचे ओळखू शकता, त्यासाठी या काही चिन्हांकडे लक्ष द्या.

१) पहिलं म्हणजे व्हिडिओमधील मूर्ती यांच्या ओठांच्या हालचाली ऑडिओशी जुळत नाहीत.

२) मूर्ती ७ जुलै रोजी बंगळुरू येथे आयोजित मनीकंट्रोल स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये बोलत असतानाचे मूळ फुटेज सुद्धा सोशल मीडियावर आहे. मूर्ती यांची मुलाखत त्यांचा मुलगा रोहन मूर्ती याने घेतली होती तेव्हा विविध विषयांवरील संभाषणात मूर्ती यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कुठेही उल्लेख केला नाही.

३) ८ नोव्हेंबर रोजी फेसबुकवर पोस्ट केलेल्या डीपफेक व्हिडिओमध्ये नारायण मूर्ती ‘क्वांटम एआय’ बद्दल बोलत असलेला आवाज मॉर्फ केलेला आहे.

४) मूर्ती यांचे इंग्रजी उच्चारण डीपफेक व्हिडिओमध्‍ये ऐकू येतेय तसे मुळातच नाही हे आपण त्यांच्या अन्य मुलाखती पाहिल्या असल्यास चटकन ओळखू शकता.

दुसरा व्हायरल व्हिडिओ २४ जून २०२२ रोजी मूर्ती बिझनेस टुडेच्या ‘माइंडरश’ कार्यक्रमात बोलतानाचा आहे. मीडिया आउटलेटने मूळ क्लिप त्याच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केली होती, जी ४५ मिनिटांपेक्षा मोठी आहे.

हे ही वाचा<< शिवराज चौहान यांचा रडताना Video व्हायरल; मुख्यमंत्री पद गमावल्याने दुःख झाल्याची चर्चा, मुळात घडलं काय?

दरम्यान यापूर्वी सुद्धा रतन टाटा, सद्गुरू, मुकेश अंबानी यांसारख्या व्यक्तींच्या जुन्या व्हिडीओ क्लिप मॉर्फ करून त्यातून गुंतवणूकदारांना फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. अशावेळी टाटा- अंबानी यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले होते.