नवी मुंबई: पर्यावरणस्नेही हरित बांधकाम उपक्रमांना, तसेच शहरांच्या शाश्वत विकासात सर्व भागधारकांना सहभागास प्रोत्साहन म्हणून कार्यरत ‘सीआयआय- इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)’ या संस्थेने नवी मुंबईत तिचा ३० वा अध्याय नुकताच औपचारिक कार्यक्रमाच्या आयोजनातून सुरू केला.

हेही वाचा >>> थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

नवी मुंबई महानगरपालिकेचे साहाय्यक संचालक (नगररचना), सोमनाथ केकाण यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनप्रसंगी, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, सीआयआय-आयजीबीसीचे प्रमुख पदाधिकारी, तसेच नवी मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि वास्तुरचनाकार उपस्थित होते. ‘सीआयआय-आयजीबीसी’ ही भारतातील प्रमुख ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र संस्था आणि संबंधित सेवांसाठी प्रसिद्ध आहे. नवी मुंबई अध्यायाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद आणि हितेन सेठी अँड असोसिएट्सचे हितेन सेठी, तर सहअध्यक्ष म्हणून, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, अशोक छाजेर हे काम पाहतील.

हेही वाचा >>> ई-वाहनांची वार्षिक विक्री ३० ते ४० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

नवी मुंबईमध्ये १२० हून अधिक ग्रीन बिल्डिंग प्रकल्प असून, ज्यातून ६१० दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ विकसित केले गेले आहे. निवासी क्षेत्रात नवी मुंबईत घरांची मागणी २०२५ पर्यंत २० टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. येथील वेगवान शहरीकरणाला आणि त्याच्या वाणिज्यिक व निवासी स्थावर मालमत्ता विकासाला शाश्वत आणि पर्यावरणपूरक वळणावर ठेवण्यासाठी नवी मुंबईतील हा अध्याय प्रयत्नशील राहील.