Edible Oil Price Hike : गणेश उत्सव सध्या जोशात सुरु आहे, तर त्यानंतर पितृ पंधरवडा लागेल, तो संपला की नवरात्र उत्सव सुरु होईल आणि त्यानंतर दिवाळी. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल ( Edible Oil ) महागणार आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट कोलमडणार हे निश्चित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सणासुदीच्या काळात तेल महाग

नवरात्रात नऊ दिवसांचे उपास असतात, दिवाळीत फराळ तयार केला जातो. या सगळ्यासाठी खाद्य तेल ( Edible Oil ) वापरलं जातं. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेलांच्या ( Edible Oil ) किंमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे हे निश्चित. पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल ( Edible Oil ) महागणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने आता बजेट कसं मांडायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावणार आहे.

अर्थमंत्रालयाने काय म्हटलं आहे?

अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार, क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आलं आहे. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के करण्यात आले आहे. हा बदल सप्टेंबर महिन्यातच होणार आहे. त्यामुळे खाद्य तेल ( Edible Oil ) महाग होणार यात काही शंकाच नाही.

हे पण वाचा- देशात गेल्या महिन्यात उच्चांकी खाद्यतेल आयात; जाणून घ्या, कोणता देश आहे सर्वांत मोठा पुरवठादार

कस्टम ड्युटी वाढवल्यावर तेलांच्या किंमती किती वाढतील?

समोर आलेल्या माहितीनुसार, कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर सर्व खाद्य तेलांवरील प्रभावी शुल्क वाढून ३५.७५ टक्के इतके होणार आहे. क्रूड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रूड सनफ्लॉवर सीड ऑइलवरील प्रभावी शुल्क दर आता ५.५ टक्क्यांनी वाढून २७.५ टक्के होणार आहे. तेच रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेलावरचं प्रभावी शुल्क आता १३.७५ टक्क्यांवरुन आता ३५.७५ टक्के इतकी होणार आहे. खाद्य तेलांच्या किंमती अशावेळी वाढवल्या जातात जेव्हा देशात काहीच दिवसांत सणासुदीचे दिवस असतील. आता सप्टेंबर महिना सरत आला आहे. पुढच्या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सण आहेत. अशावेळी सणासुदीच्या दिवसांत खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ होणार हे निश्चित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edible oil will pirce hike due to government raises import tax on edible oils scj