नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारीमध्ये देशातील एकदंर प्रवासी वाहनांची मागणी ७ टक्क्यांनी घसरली असली तरी, विद्युत शक्तीवरील प्रवासी वाहनांच्या (ईव्ही) किरकोळ विक्रीत मात्र याच महिन्यांत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकंदर ८,९६८ ईव्ही या महिन्यांत विकल्या गेल्या असून, टाटा मोटर्सने या विभागात तिचे अव्वल स्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण ईव्ही विक्रीचे प्रमाण ७,५३९ असे होते, असे ‘फाडा’ या वाहन वितरकांच्या संघटनेने शुक्रवारी जाहीर केले. फेब्रुवारीत टाटा मोटर्सच्या ३,८२५ ईव्ही विकल्या गेल्या, तर त्या खालोखाल एमजी मोटर इंडियाने ३,२७० वाहने विकली. आता एकूण प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत ‘ईव्हीं’नी ३ टक्के वाटा गाठला आहे, असे फाडाचे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले.

गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्री ७६,०८६ अशी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ मध्ये विक्री झालेल्या ८२,७४५ दुचाकींच्या तुलनेत ८ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या महिन्यात २१,३८९ इलेक्ट्रीक दुचाकींच्या विक्रीसह बजाज ऑटोने या विभागात आघाडी घेतली. फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक तुलनेत ५ टक्क्यांची वाढ होऊन ती ५३,११६ वर पोहोचली आहे.