Elon Musk Tesla Office: टेस्ला भारतात आपला मोटार वाहन व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे. एलॉन मस्कच्या टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे. टेस्ला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारतातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी प्रोत्साहन आणि फायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

भाडे दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढणार

कार्यालयाची जागा टेस्लाच्या भारतीय उपकंपनीकडून पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. टेस्ला उपकंपनीने पंचशील बिझनेस पार्कमधील बी विंगच्या पहिल्या मजल्यावर ५५८० चौरस फूट कार्यालयाची जागा घेतली आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. त्याचे भाडे १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार आहे आणि दोन्ही कंपन्यांनी दरवर्षी ५ टक्के वाढीसह ३६ महिन्यांच्या लॉक-इन कालावधीवर सहमती दर्शविली आहे. या कंपनीची इच्छा असल्यास ती आणखी पाच वर्षांसाठी भाडेकरार वाढवू शकते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Trump picks Susie Wiles as his chief of staff
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘चीफ ऑफ स्टाफ’पदी महिला ऑफिसरची नियुक्ती; कोण आहेत सूसी विल्स? या पदाचे महत्त्व काय?
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव

हेही वाचाः मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीला दिला ‘नवरत्न’चा दर्जा, यादीत आता १४ नावांचा समावेश

भाडे किती ठरले?

रिअल इस्टेट अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सच्या मते, टेस्लाने ६० महिन्यांसाठी जागा भाड्याने घेण्यासाठी ११.६५ लाख रुपये मासिक भाडे आणि ३४.९५ लाख रुपये सुरक्षा ठेव भरली आहे. खरं तर पंचशील बिझनेस पार्क सध्या बांधकामाधीन आहे आणि त्याचा एकूण आकार १०,७७,१८१ चौरस फूट आहे. हे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.

हेही वाचाः Money Mantra : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचाच…

उपकंपनी २०१९ मध्ये उघडण्यात आली

इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, भारत सरकार टेस्लाच्या परदेशी पुरवठादारांना विशेषत: चिनी पुरवठादारांना देशात उत्पादन करण्याची परवानगी देऊ शकते. सरकारने याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. टेस्लाने २०१९ मध्ये बंगळुरूमध्ये आपली भारतीय उपकंपनीची नोंदणी केली होती. याशिवाय देशात इलेक्ट्रिक वाहने आणि ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी कारखाना उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी एखादे कार्यालय भाडेतत्त्वावर घेण्याचेही ठरले होते.