World’s Top Billionaires List: जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांच्या संपत्तीत चढ-उतार येतच असतात. सध्या एलॉन मस्क जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत आहेत. यानंतर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्टचा क्रमांक लागतो. चला तर जाणून घेऊया जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत कोणाचा समावेश आहे? तसेच त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे?

एलॉन मस्क टॉप १ वर

जर आपणाला जगातील टॉप वन अब्जाधीशाबद्दल बोलायचे झाल्यास एलॉन मस्क त्यात पहिल्या स्थानी आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार ((Bloomberg Billionaire Index)), गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत ९.३५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यानंतर एलॉन मस्कची संपत्ती (Elon Musk Networth) २२६ अब्ज डॉलर झाली आहे. संपत्तीत घट झाल्यानंतरही तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. एलॉन मस्क हे टेस्ला(Tesla), स्पेसएक्स आणि ट्विटर यांसारख्या कंपन्यांचे मालक आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
top 10 search on google in 2024
Google Search: भारतीय गुगलवर गेल्या वर्षभरात काय शोधत होते माहितीये? गुगल सर्च रिपोर्टची माहिती आली समोर!
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

बर्नार्ड अर्नॉल्टची निव्वळ संपत्ती

बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील टॉप १० यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट हा फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्या संपत्तीत डॉलर असल्यास ३.०४ अब्ज डॉलर घट झाली आहे. या घसरणीनंतर त्यांची एकूण संपत्ती (Bernard Arnault Networth) १८३ अब्ज डॉलर इतकी कमी झाली आहे.

टॉप १० अब्जाधीशांची यादी

जेफ बेझोस टॉप १० अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १६२ अब्ज डॉलर्स आहे. तसेच लॅरी एलिसनची एकूण संपत्ती १३४ अब्ज डॉलर आहे, तो चौथ्या क्रमांकावर आहे. बिल गेट्स यांचा पाचव्या क्रमांकावर समावेश आहे. त्याची एकूण संपत्ती १२९ अब्ज डॉलर आहे तर लॅरी पेजची एकूण संपत्ती १२२ बिलियन डॉलर आहे आणि तो सहाव्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ सातव्या स्थानावर वॉरेन बफे, आठव्या स्थानावर सर्जी ब्रिन, नवव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मर आणि दहाव्या स्थानावर मार्क झुकेरबर्ग आहेत.

मुकेश अंबानींची संपत्ती वाढली

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यांची एकूण संपत्ती ६७० अब्ज डॉलरने वाढली आहे. आता त्यांची एकूण मालमत्ता (मुकेश अंबानी नेटवर्थ) $९१.२ बिलियन झाली आहे. या वाढीनंतर ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहेत. गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एम-कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. यानंतरही ती भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

गौतम अदाणी यांच्या संपत्तीत वाढ

भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यांची एकूण संपत्ती ८०१५ कोटी रुपयांनी वाढली आहे. यानंतर त्यांची नेटवर्थ (Gautam Adani Networth) ६२.८ बिलियन डॉलर झाले आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते २१व्या स्थानावर आहेत.

Story img Loader