EPF Balance Check: कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही पैसे दरमहा पीएफ खात्यात जमा केले जातात. पीएफ खात्यावर सरकारकडून निश्चित व्याज दिले जाते. हे सर्व व्यवस्थापित करण्याचे काम सरकारच्या वतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (EPFO) केले जाते. ईपीएफओ पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची गरज लागत नाही, कारण तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता. मिस्ड कॉल व्यतिरिक्त कर्मचारी चार प्रकारे आपल्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकतात. पण एका मिस्ड कॉलद्वारे पीएफ खात्यामधील रक्कम कशी पाहायचा जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मिस्ड कॉलद्वारे पाहा पीएफ खात्यामधील शिल्लक रक्कम

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन (पीएफ खाते आणि बँक खात्याला जोडलेला) 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुम्ही या नंबरवर कॉल करताच तो आपोआप डिस्कनेक्ट होईल, यानंतर तुमच्या पीएफ खात्यामधील जमा रकमेचा मेसेज तुमच्या नंबरवर पाठवला जाईल.

EPFO वेबसाईटवरुन तपासा जमा रक्कम

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम EPFO च्या वेबासाइटद्वारे देखील तपासू शकता, यासाठी तुम्ही मोबाईलवर सर्वप्रथम EPFO साइट सर्च करा, यानंतर त्यातील employees सेक्शन निवडा. यानंतर UAN आणि पासवर्ड नोंदवा. त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. येथे तुम्हावा तुमचे ऑनलाईन पीएफ मिळेल ज्यात तुम्ही पीएफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पीएफवरील व्याजाची रक्कम पाहू शकता.

एसएमएसद्वारे कशी पाहाल पीएफ खात्यातील रक्कम

तुम्ही एक साधा एसएमएस पाठवून तुमच्या पीए खात्यातील जमा रक्कम तपासू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्हाला LAN ऐवजी ENG टाइप करावे लागेल तसेच मराठीसाठी MAR लिहावे लागेल. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवायची असल्यास EPFOHO लिहून तुमचा UAN नंबर टाकावा लागेल आणि तो 7738299899 या क्रमांकावर लिहून पाठवावा लागेल, यानंतर लगेचच तुम्हाला खात्यातील शिल्लक माहिती सहज मिळेल.

उमंग ॲपद्वारे तपासा जमा रक्कम

तुम्ही उमंग पोर्टलद्वारे देखील ईपीएफओची सुविधा वापरु शकता यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलमध्ये उमंग ॲप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करावे लागेल, आता अॅपमध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जावे लागेल. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक रक्कम तपासू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epf balance check epfo pf balance check number miss call how to check epfo balance by sms sjr