नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नवीन १३.४१ लाख सदस्य सरलेल्या ऑक्टोबर २०२४ या महिन्यात नव्याने दाखल करून घेतल्याचे नुकतेच स्पष्ट केले. संघटित क्षेत्रातील रोजगारातील वाढीसंबंधी डळमळलेले वातावरण बदलत असल्याचे आश्वासक चित्र ही वाढ दर्शविते.
हेही वाचा >>> Year Ender 2024 Startup Companies : रॅपिडो ते मनी व्ह्यू… २०२४ मध्ये ‘या’ स्टार्टअप कंपन्यांची बिलियन डॉलर क्लबमध्ये एन्ट्री
‘ईपीएफओ’ने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, ७.५० लाख नवीन सदस्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांचे सदस्यत्व घेतले आहे. यामध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातून ५.४३ लाख सदस्य म्हणजेच ५८.४९ टक्के पहिल्यांदाच नोंदणी करणारे नवीन सदस्य आहेत. संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील होणारे बहुतेक लोक तरुण आहेत,
हेही वाचा >>> ‘अर्थसंकल्पाचा रोजगार निर्मिती, शेती उत्पादकता वाढीवर भर हवा’; पंतप्रधान-अर्थतज्ज्ञांच्या बैठकीचा रोख
लिंगनिहाय विश्लेषणानुसार, सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात नोंदणी झालेल्या नवीन सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या २.०९ लाख आहे. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत महिला सदस्यांच्या संख्येयत २.१२ टक्क्यांनी वार्षिक वाढ दर्शवतो. महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबलाकडे व्यापक बदल दर्शवते. सर्व राज्यांपैकी महाराष्ट्र आघाडीवर असून या महिन्यामध्ये २२.१८ टक्के निव्वळ सदस्य जोडले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा आणि गुजरात या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. रस्ते वाहतुकीशी संबंधित उद्योग, खासगी क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया कंपन्या आणि राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त इतर बँकांनी सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून दिला आहे.