EPFO Higher Pension कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ जुलैपर्यंत वाढवली आहे. उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ती ३ मे ते २६ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ दिवसांसाठी शेवटची संधी

पात्र निवृत्तीवेतनधारक/भागधारकांना संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने १५ दिवसांची शेवटची संधी देण्यात आली आहे, असंही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः गुजरातमधील चिपनिर्मितीचा संयुक्त प्रकल्प अडचणीत; वेदान्तच्या जागी ‘फॉक्सकॉन’कडून नव्या भागीदाराचा शोध

११ जुलै ही शेवटची तारीख

निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांसाठी पर्याय/संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वीही २६ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती

तत्पूर्वी EPFO ​​ने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर विद्यमान भागधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले होते. लोकांच्या मागणीनंतर त्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.

हेही वाचाः संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘बायजू’ची आता धावाधाव; गुंतवणूकदारांनाही दिले ‘हे’ आश्वासन

EPFI GMS वर तक्रार करता येणार

KYC अपडेटमध्ये समस्यांमुळे पर्यायाच्या पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यात अडचण येत असलेल्या कोणत्याही पात्र पेन्शनधारकाला तात्काळ निराकरणासाठी EPFI GMS वर तक्रार दाखल करता येईल, असंही EPFO ने सांगितले. निवेदनानुसार, उच्च वेतनावरील उच्च निवृत्तीवेतन लाभांची निवड करून तक्रार केली जाऊ शकते. हे पुढील कारवाईसाठी रेकॉर्ड सुनिश्चित करेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo higher pension want to apply for higher pension epfo extended the deadline vrd
Show comments