पीटीआय, नवी दिल्ली

सरकारकडून विशेष आर्थिक क्षेत्राची (एसईझेड) विदा ही एनएसडीएलच्या सॉफ्टवेअरवरून आईसगेट सिस्टीमवरून आणली जात आहे. यामुळे सोन्याच्या आयातीची आकडेवारीत दुहेरी मोजणी झाल्याने चूक झाली होती. आता ही चूक सुधारण्यात आली आहे, असा खुलासा सरकारी सूत्रांनी गुरुवारी केला.

Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…

सरकारने सुरुवातीला गेल्या वर्षातील नोव्हेंबरमधील सोन्याची आयात जास्त जाहीर केली होती. यामुळे व्यापारी तूट ३७.८४ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. नंतर सुधारित आकडेवारी जाहीर करून व्यापारी तूट ३२.८ अब्ज डॉलरवर आणण्यात आली आहे. याचबरोबर आयातीच्या संपूर्ण आकडेवारीत आता सुधारणा करणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नोव्हेंबरमधील सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी करून ९.८४ अब्ज डॉलरवर आणली आहे.

हेही वाचा >>>Spotify : “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, ‘Work From Anywhere’ वर स्पॉटिफाय ठाम

विशेष आर्थिक क्षेत्राची विदा एनएसडीएलवरून आईसगेटवर आणली जात आहे. यात झालेली चूक आता सुधारण्यात आली आहे. असे असले तरी विदा वर्ग करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. जगभरात सांख्यिकी प्रक्रियेत विदेमध्ये सुधारणा केल्या जातात. विदा संकलन ही गुंतागुंतीची प्रक्रिया असून, त्यात ५०० ठिकाणांहून दररोज २.५ लाख व्यवहारांची नोंद होत असते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Story img Loader