मुंबईः पहिल्या पिढीचे उद्योजक आणि छोटेखानी बांधकाम व्यवसायाला पायाभूत सुविधा क्षेत्रातील एस्सार समूहात रूपांतरित करणारे शशिकांत रुईया यांचे दीर्घ आजाराने सोमवारी मध्यरात्री मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

सुमारे महिनाभरापूर्वी ते अमेरिकेत सुरू असलेल्या उपचारातून मुंबईत परतले होते. तर पुढच्या महिन्यात ते वयाची ८१ वर्षे पूर्ण करणार होते. रुईया आणि एस्सार परिवाराचे कुटुंबप्रमुख शशिकांत रुईया यांचे निधन झाल्याची माहिती आम्ही अत्यंत दु:खाने देत आहोत, असे रुईया कुटुंबाने निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंजू आणि दोन मुले प्रशांत आणि अंशुमन असा परिवार आहे.

Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Loksatta vyaktivedh Rustam Soonawala Polythene IUD Contraceptive
व्यक्तिवेध: डॉ. रुस्तम सूनावाला
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
Jean Marie Le Pen the founder of the National Front in France passed away
फ्रान्सच्या अतिउजव्या नेत्याचे निधन; स्थलांतरितांना कठोर विरोध करणारे ज्यँ मारी ल पेन कालवश

हेही वाचा >>>December 2024 Bank Holidays : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १७ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकीर्दीची सुरुवात करून, शशी आणि त्यांचा भाऊ रवी यांनी १९६९ मध्ये एस्सारची पायाभरणी केली. त्यांनी मद्रास बंदर न्यासाकडून अडीच कोटी रुपयांचा कार्यादेशही पटकावला. बांधकाम आणि अभियांत्रिकी प्रकल्पांवर सुरुवातीला लक्ष केंद्रित करणाऱ्या एस्सारने पुढे अनेक पूल, धरणे आणि वीज प्रकल्प उभारले. ऐंशीच्या दशकात, एस्सारने तेल आणि वायू मालमत्तांच्या संपादनासह ऊर्जा क्षेत्रात प्रवेशासह व्यावसायिक विविधता साधली. तर दशकभरानंतर, ते पोलाद आणि दूरसंचार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण स्पर्धक बनले. गुजरातमध्ये एक मोठा पोलाद प्रकल्प उभारण्यासह, हचिसनसह संयुक्त उपक्रमात भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे दूरसंचार प्रदाते म्हणून त्यांनी स्थान निर्माण केले. निधीची चणचण असतानाही गुजरातमध्ये त्यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला.

एस्सार समूह नंतर दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडला आणि रशियाच्या रोझनेफ्टच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदार समूहाला तेल शुद्धीकरण प्रकल्पाचीही समूहाने विक्री केली. थकीत कर्जाचा भार वाढत गेल्याने सामोरे जावे लागलेल्या दिवाळखोरीच्या कार्यवाहीतून पोलाद प्रकल्पाची मालकीही आर्सेलर मित्तलला सोडावी लागण्याची त्यांच्यावर पाळी आली. तरी आजही एस्सार समूहाच्या संकेतस्थळावर उपलब्ध तपशिलानुसार, या समूहातील कंपन्यांचा एकत्रित महसूल १४ अब्ज डॉलरच्या (सुमारे १.१७ लाख कोटी रुपये) घरात जाणारा आहे.

हेही वाचा >>>आइस्क्रीम व्यवसायाच्या स्वतंत्र सूचिबद्ध कंपनीत विलगीकरणास हिदुस्तान युनिलिव्हरची मान्यता

रुईया यांनी राष्ट्रीय आणि उद्योग संघटनांमध्ये अनेक प्रमुख पदे भूषवली. ते ‘फिक्की’च्या व्यवस्थापकीय समितीचा भाग होते आणि भारत-अमेरिका संयुक्त व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते ‘इंडियन नॅशनल शिपओनर्स असोसिएशन’चे माजी अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या ‘इंडो-यूएस सीईओ फोरम’ आणि ‘इंडिया-जपान बिझनेस कौन्सिल’चे सदस्यदेखील होते.

प्रतिष्ठित उद्योगपती शशिकांत रुईया यांनी भारताच्या उद्यम परिदृश्याच्या कायापालटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी एस्सार समूहाचा पाया घातला आणि त्याला जागतिक समूह बनवले. हा असाधारण वारसा तसेच त्यांनी जपलेली मूल्ये आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील.- पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

Story img Loader