पीटीआय, नवी दिल्ली
कर अधिकाऱ्यांनी वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणीकृत सुमारे १८,००० बनावट कंपन्यांचा छडा लावला असून, त्यांनी सुमारे २५,००० कोटी रुपयांची करचोरी केली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनावट कंपन्यांविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या विशेष मोहिमेत, जीएसटी अधिकाऱ्यांकडून ७३,००० कंपन्यांची वैध म्हणून ओळख पटवली आहे. मात्र मालाची प्रत्यक्ष विक्री न करता केवळ परतावा (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे सरकारी तिजोरीची फसवणूक केल्याचा संशय आहे, अशा १८ हजार बनावट कंपन्या या मोहिमेत आढळून आल्या आहेत. ही या प्रकारे राबविली गेलेली दुसरी राष्ट्रव्यापी मोहिम होती. ज्यामध्ये केवळ नाममात्र अस्तित्वात असलेल्या जवळपास १८,००० कंपन्या सुमारे २४,५५० कोटी रुपयांच्या संशयित करचुकवेगिरीत गुंतल्या असल्याचे अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मोहिमेदरम्यान काही कंपन्यांनी सुमारे ७० कोटी रुपयांची ऐच्छिक जीएसटी भरणा केल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>Gold Silver Rate Today : दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; कुठे किती भाव घसरले? जाणून घ्या

यंदाची दुसरी मोहीम १६ ऑगस्टपासून सुरू झाली आणि ऑक्टोबरअखेरपर्यंत ती सुरू राहिली. या आधी १६ मे २०२३ ते १५ जुलै २०२३ दरम्यान बनावट नोंदणीविरोधातील पहिल्या मोहिमेत, जीएसटी नोंदणी असलेल्या एकूण २१,७९१ संस्था अस्तित्वात केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचा दिसून आले होते. पहिल्या मोहिमेदरम्यान सुमारे २४,०१० कोटी रुपयांची संशयित करचोरी आढळून आली होती.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by gst authorities print eco news amy