संयुक्त अरब अमिराती (UAE) राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेजने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या दहा वर्षांत आखाती देशातील एअरलाइन्सने बॉलिवूड स्टारबरोबर भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ आहे.
एतिहाद एअरवेजच्या व्हिडिओमध्ये कतरिना दिसणार
एतिहादची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कतरिना क्रिएटिव्ह आणि जाहिरात मोहिमेच्या व्हिडीओंच्या मालिकेत दिसेल, एतिहाद एअरवेजने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचाः बायजू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; कर्जदारांना ९९४७ कोटी देण्यास तयार, नेमकी योजना काय?
ही भागीदारी एअरलाइनच्या योजनेचा भाग
एतिहाद एअरवेजने एका निवेदनात म्हटले आहे की, कतरिना कैफबरोबरची ही भागीदारी भारतातील सतत वाढीसाठी एअरलाइनच्या धोरणाशी सुसंगत आहे. ही भागीदारी भारतीय बाजारपेठेत एतिहादला आणखी मजबूत करेल, असंही एअरलाइन्सने म्हटले आहे.
हेही वाचाः संदीप बक्षी पुन्हा ICICI बँकेचे पुढील ३ वर्षांसाठी एमडी, RBI कडून मंजुरी
एतिहाद सध्या किती शहरांमधून उड्डाण करते?
सध्या एतिहाद एअरवेज भारतातील आठ शहरांमधून उड्डाण करते. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोलकाता आणि मुंबई शहरांचा समावेश आहे. अमिना ताहेर, एतिहाद एअरवेज उपाध्यक्ष आणि मार्केटिंग आणि प्रायोजकत्व प्रमुख असलेल्या अमिना ताहेर म्हणाल्या, “आम्ही कतरिना कैफचे एतिहाद एअरवेज कुटुंबात आमचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून स्वागत करतो. कतरिनाबरोबर आमची भागीदारी खूप चांगली आहे. ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर कतरिना कैफ म्हणाली, विचारपूर्वक नातेसंबंध निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या संघाचा भाग होण्यासाठी मी उत्साहित आहे. मी एतिहादचे प्रतिनिधित्व करण्यास आणि त्यांच्या प्रवासाचा भाग होण्यास उत्सुक आहे.
एतिहादने ‘या’ कारणासाठी कतरिनाला आपली राजदूत बनवली होती
एतिहाद एअरवेजने सांगितले की, २०१० मध्ये कतरिनाच्या एतिहादबरोबरच्या सहवासावर ही भागीदारी निर्माण झाली, जेव्हा तिला एतिहादचा प्रवास अनुभव दाखवणारी एक विवेकी प्रवासी म्हणून दाखवण्यात आली. एअरलाइन्सने म्हटले आहे की, कतरिना आणि एतिहाद यांच्यातील ही भागीदारी एतिहादचे भारतातील भारतीय समुदाय आणि यूएई, यूएस, यूके आणि कॅनडा यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक बाजारपेठांशी असलेले मजबूत संबंध दर्शवते.