अमेरिकन बँकांपैकी एक असलेल्या गोल्डमन सॅक्सला युरोपियन सेंट्रल बँकेने (ECB) ६.६३ दशलक्ष युरो (७२ लाख डॉलर ) दंड ठोठावला आहे. हे बँकेच्या युरोपियन शाखेतील भांडवल आवश्यकतांचे चुकीच्या पद्धतीने दाखवल्या प्रकरणाशी संबंधित आहे. त्यामुळेच ईसीबीने हा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत व्याजदर वाढल्यामुळे तीन बँका बुडाल्यानंतर कडक पावलं उचलली जात आहेत.

गोल्डमन सॅक्स बँक युरोपने २०१९, २०२०, २०२१ दरम्यान क्रेडिट जोखीम अहवाल नियमांचे उल्लंघन केले आहे. क्रेडिट जोखमी असलेल्या मालमत्तेची नोंद बँकेने सलग आठ तिमाहीत केली आहे, असंही ECBने सांगितले आहे.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

हेही वाचाः सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स आणला शून्यावर, तेल कंपन्यांना मोठा दिलासा

कॉर्पोरेट एक्सपोजर चुकीच्या श्रेणीमध्ये दाखवले

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोल्डमन सॅक्सने कॉर्पोरेट एक्सपोजरचे चुकीच्या श्रेणीमध्ये दाखवले आहे. या कारणांमुळे बँकेला भविष्यात कोणतीही चूक वेळेत पकडता येणार नाही. कॅपिटल रेशो हा एक अतिशय महत्त्वाचा निर्देशांक आहे, जो बँकेची ताकद आणि तोटा सहन करण्याची क्षमता दर्शवतो. यापूर्वी जुलै २०१७ मध्ये वार्षिक आणि त्रैमासिक अहवालांमध्ये योग्य माहिती न दिल्याबद्दल ECB ने इटालियन बँक बँका पोपोलारे डी विसेन्झा यांना ८.७ दशलक्ष युरोचा दंड ठोठावला होता.

हेही वाचाः आयफोन तयार करणारी Foxconn कंपनी ‘या’ राज्यात करणार तब्बल ४ हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार नोकऱ्यांची होणार निर्मिती

अमेरिकेत बँका का बुडत आहेत?

मार्चपासून आतापर्यंत सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक अमेरिकेत बुडाली आहे. त्यामागे व्याजदरात वाढ झाल्याचे कारण सांगितले जात आहे. अमेरिकेतील बँकिंग संकटाचा परिणाम युरोपीय बँकांवरही दिसून येत आहे. युरोपमधील क्रेडिट सुईस देखील डबघाईला आल्यामुळे यूबीएस बँकेने तिला विकत घेतले आहे.