पीटीआय, नवी दिल्ली
मध्यवर्ती बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवूनदेखील कर्ज घेऊन वाहन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल दिसत असून, सरलेल्या मे महिन्यात वाहनांसाठी वितरित कर्ज २२ टक्क्यांनी वाढून ५.०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त ताज्या आकडेवारीनुसार, एकूण वाहन कर्ज मे २०२१ मधील ३.६५ लाख कोटी रुपयांवरून मे २०२२ मध्ये ४.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर चालू वर्षातील १९ मे २०२३ पर्यंत ते ५.०९ कोटी रुपये कर्जाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२२ मध्ये वाहन कर्ज वितरणातील वाढ केवळ १४ टक्के होती.
एकीकडे वाहनांच्या वाढत्या किमती आणि दुसरीकडे वाढते वाहन कर्जदर असा दुहेरी मारा असूनदेखील प्रवासी वाहनांची मागणी मजबूत राहिली आहे आणि यामुळे वाहननिर्मिती उद्योगांच्या वाढीस मदत झाली आहे, असे मत इक्रा लिमिटेडचे क्षेत्रीय प्रमुख आणि उपाध्यक्ष रोहन कंवर गुप्ता यांनी व्यक्त केले.
GAURAV MUTHE